सातारा

सावधान! सातारा-सज्जनगड मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Balkrishna Madhale

सातारा : स्वच्छ भारत अभियानांतर्गत सातारा जिल्ह्याने नावलौकिक मिळवला असला तरी शहराच्या जवळपासच्या उपनगरात, तसेच रस्त्यांवर कच-याचे साम्राज्य पसरल्याचे चित्र आहे. सातारा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून बोगद्याच्या पलीकडे सातारा ते सज्जनगड रस्त्यावर नेहमीच कचरा टाकला जातो. ब-याच वेळा हा सर्व प्रकारचा कचरा येथे टाकल्यानंतर परिसरात व रस्त्यावरही पसरला जातो. यामुळे येथून प्रवास करताना येथील घाणीमुळे नाकीनऊ येते. या कच-याच्या दुर्गंधीमुळे आरोग्यवरही परिणाम होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  

सातारा बोगद्यामार्गे पुढे सज्जनगड व ठोसेघर येथे अनेक पर्यटक ये-जा करत असतात. मात्र, बोगद्याच्या पलीकडे गेल्यावर याच पर्यटकांना विनाकारण घाणीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास येथे शहरातील सर्वांत मोठी कचराकुंडी होण्यास वेळ लागणार नाही. याच कचराकुंडीत सध्या मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येथे मोकाट कुत्र्यांची संख्याही भरपूर आहे.  

सायंकाळच्यावेळी ही भटकी कुत्री काही दुचाकींच्या अपघातासही कारणीभूत ठरली आहेत. त्यामुळे विनाकारण दुचाकीवाल्यांच्यात वादावादीही पाहावयास मिळत आहे. त्यामुळे कचरा टाकणा-यांनीही विचार करायला हवा. उघड्यावर कचरा टाकणा-यांवर योग्य ती कारवाई केली पाहिजे, असे येथून प्रवास करणा-या गावांतील ग्रामस्थांना वाटत आहे. शहरातील सुशिक्षित नागरिकांनीच जर असा रस्त्यावर कचरा टाकला तर कसे होणार, असा प्रश्नच उपस्थित होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर दुर्गंधी पहायला मिळत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावरती वेळीच तोडगा काढणे अपेक्षित आहे, अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात वाहतुकीत मोठे बदल, अनेक रस्ते बंद; पर्यायी मार्ग कोणते? खरेदीला गेल्यावर पार्किंग कुठे करायचं? वाचा सविस्तर अपडेट्स

Viral Video: डीजेचा दणदणाट नव्हता, लेझीम-टिपरीचा जल्लोष होता; पाहा १९९१ मधील पुण्याची पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणूक

Jat Municipality Photo Dispute : जत पालिकेची सभा छायाचित्राच्या वादात; मुख्यमंत्री-आमदारांच्या फोटोवरून जोरदार खडाजंगी, काँग्रेसचा सभात्याग

Marathi News Live Updates : कोकणवासियांचा खोळंबा! मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, प्रचंड वाहतूक कोंडी

Borkhind Samruddhi Highway Interchange : नाशिकला समृद्धी महामार्गाचा थेट फायदा! बोरखिंड इंटरचेंजला मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 343 कोटींचा निधी जाहीर

SCROLL FOR NEXT