Koyna Dam
Koyna Dam esakal
सातारा

साठीतील कोयना धरण 51 वेळा ठरले 'बाहुबली'

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : पावसाळा सुरू झाला, की कोयना धरणाची (Koyna Dam) चर्चा राज्यासह कर्नाटक व आंध्रपर्यंत गाजते. धरण भरले का, किती भरले, सध्याची काय स्थिती आहे, पाणीसाठा नियंत्रणात आहे की नाही, किती गरज आहे, पाणी कधी सोडणार आदी प्रश्नांचा कल्लोळ होतो. यंदाही सरासरीपेक्षाही लवकर कोयना धरण दूधडी भरून वाहू लागल्याने वीज, सिंचनाची चिंता मिटली आहे. कोयना धरणाने यंदा साठीत प्रवेश केला आहे. त्यात तब्बल ५१ वेळा कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे कोयना म्हणजे पाणीसाठ्यातील बाहुबलीच म्हणावे लागेल. केवळ नऊ वेळा कमी क्षमतेने धरण भरल्याची नोंद आहे.

पावसाळा सुरू झाला, की कोयना धरणाची (Koyna Dam) चर्चा राज्यासह कर्नाटक व आंध्रपर्यंत गाजते.

कोयना धरण महाराष्ट्र-कर्नाटक आणि आंध्र प्रदेशसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे पावसाळ्यात तिन्ही राज्ये धरणाचा पाणीसाठा कसा आहे, याकडे लक्ष ठेवून असतात. धरणाच्या उभारणीपासून आजअखेर तब्बल ५१ वेळा कोयना धरण पूर्ण क्षमेतेने भरले आहे. कोयना धरणाला ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. नऊवेळा साठवण क्षमतेपेक्षा धरणातील पाणीसाठा कमी राहिला. मात्र, तरीही उपलब्ध पाण्यात सिंचनासह विजेचा प्रश्न मार्गी लागल्याच्या नोंदी आहेत. कोयना धरणाचा मृत पाणीसाठा ५.२५ टीएमसी आहे. ३२.५० टीएमसी पाणीसाठा सिंचनासाठी, तर ६७.५० टीएमसी पाणीसाठा वीज निर्मितीसाठी वापरला जातो आहे. धरणाची प्रशासकीय मंजुरी १९५४ मध्ये मिळाली.

प्रत्यक्षात धरणाच्या (Koyna Dam Project) कामाला १९ जानेवारी १९५४ मध्ये सुरूवात झाली. धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये पूर्ण झाले. प्रत्यक्ष उद्घाटन सोहळा १६ मे १९५२ रोजी झाला, तर १९६१ मध्ये पहिल्यांदा तेथे पाणी अडविले गेले. त्यामुळे अखंड वाटचालीत त्या सगळ्या गोष्टी मैलाच्या ठरल्या आहेत. कोयनेचे तांत्रिक वर्ष एक जून ते ३१ मे अखेर आहे. पाण्याची सध्याची साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे, तर तब्बल १२ लाख २३ हजार हेक्टर जमीन ओलीताखाली आली आहे. त्यामुळे कोयना धरण अत्यंत महत्वाच्या धरणात येते. त्याची साठवण क्षमता २००३ मध्ये ९८.७८ वरून वाढवून १०५.२५ टीएमसी करण्यात आली. दोन वेळा लेक टॅपिंग तंत्राचाही वापर केला गेला आहे. साठ वर्षात कोयना धरण तब्बल ५१ वेळा पूर्ण क्षमेतेने भरले आहे. त्यामुळे कोयना बळीराजासहीत सर्वांसाठीच बाहुबली ठरले आहे.

यावर्षी होता कमी पाणीसाठा

वर्ष - पाणीसाठा

  • १९६८ - ९४.०२० टीएमसी

  • १९७२ - ८९.५९७ टीएमसी

  • १९८७ - ९१.२३६ टीएमसी

  • १९८९ - ९८.९८६ टीएमसी

  • १९९५ - ९५.७८९ टीएमसी

  • २००० - ९१.१२४ टीएमसी

  • २००३ - ९३.२७१ टीएमसी

  • २०१५ - ९४.३५० टीएमसी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT