Latur gaja bail  sakal
सातारा

Latur: देशातला सर्वात मोठा गजा बैल देणार मृत्यूनंतरही प्रेरणा; नेमक काय आहे कारण!

Bull News: गजाच्या प्रत्येक हाडाची जुळणी करत उभारलेला सांगाडा गजाच्या जीवंतपणी असणाऱ्या भव्यतेची जाणीव करुन देत आहे.

संजय शिंदे t@ssanjaysakaal

Gaja Bail: देशातील सर्वात मोठा बैल म्हणून नावाजलेला कसबे डिग्रज (ता.मिरज) येथील गजा बैलाच्या आठवणी त्याच्या मृत्यूनंतरही जागवण्यासाठी तीन वर्षे अथक झटणाऱ्या शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापकांना यश आले आहे.

गजाच्या प्रत्येक हाडाची जुळणी करत उभारलेला सांगाडा गजाच्या जीवंतपणी असणाऱ्या भव्यतेची जाणीव करुन देत आहे. हा सांगाडा सर्वच पशुपालकांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.

सर्वांत मोठा बैल म्हणून इंडिया बुकात नावलौकिक मिळवलेला कसबे डिग्रज येथील गजा बैलाने २०२१ रोजी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबियांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब आकाराच्या, तसेच जवळपास शंभर किलोपेक्षाही जास्त वजन असलेल्या गजाला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गजाने आजवर अनेक पुरस्कार मिळवले. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची. या माध्यमातून मालक सायमोते यांना गजाने कर्जमुक्त केले होते.

गजाच्या मृत्यूनंतर मालक सायमोते यांनी गजा आपल्याजवळ जतन करुन ठेवायचा, असा निश्चिय केला. शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. शिल्पा साळुंखे -मोडेकर, डॉ. गुणाजी यादव यांच्यासह सहकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार गजावर जमीनीत पुरुन अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगाडा सुमारे चार महिने जमिनीत पुरुन ठेवावा लागला. त्याच्या अंगावरचे मांस जमिनीतील जीवाणूंनी खाल्ले. त्यानंतर एक एक हाडे वेगळी झाली. विविध प्रक्रीया करुन हाडे गोळा करण्यात आली. अगदी छोट्यातले छोटे हाडे क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात गजाचे मालक सायमोते यांनी आणून दिली. त्यानंतर गजाला उभारणीची मोहीम सुरू झाली.

त्यामध्ये टप्पे ठरविण्यात आले. प्रथम हाडे स्वच्छ करण्यात आली. रासायनिक प्रक्रीयेव्दारे हाडाच्या मूळ तत्वाला बाधा येऊ नये, म्हणून सुमारे महिनाभर उन्हात ठेवावी लागली. हाडासारखा रंगही देण्यात आला. गजाच्या जीवंतपणी त्याच्या शरीराचे आकारमान यामध्ये प्रामुख्याने शरीराची उंची, रुंदी आणि एकूणच देहबोली हुबेहुब उभारता यावी, यासाठी त्याच्या हाडांची मोजणी आणि जुळवणी हे परिश्रमकारक होते. गजाच्या एकुणच वजनामध्ये त्याच्या हाडांचे असलेले वजन सर्वसामान्यपणे आढळणाऱ्या बैलांच्या हाडाच्या वजनांच्या तुलनेत तिप्पट वजनाचे होते. शरीररचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी अगदी रात्री दहापर्यंतही कामे केली. गजा अवाढव्य असल्याने त्याची हाडे जड होती. ती उभी करताना दोन-तीन जण लागत होते.

गजाला सांगाडा स्वरुपात उभा करताना विभागातील कर्मचाऱ्यांचा दिवस आणि रात्र एक झालेली होती. या सर्वांचे साक्षीदार मालक सायमोते वेळोवेळी उपस्थित होते. अशाप्रकारे सर्वांच्या सहकार्यातून गजाला उभारण्यात आले, असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

महाविद्यालयात गजाच्या सांगाड्याचे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी डॉ. के. डी. कोकाटे, डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. अनिल भिकाने, डॉ. मिलींद मेश्राम यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

यांनी दिले योगदान..

डॉ. शिल्पा साळुंखे- मोडेकर

डॉ. सी.डी. कच्छवे

डॉ. गुणाजी यादव

-निवृत्त लिपिक तेली

- प्राध्यापक व विद्यार्थी.

कुटुंबाला दिला मान मिळवून

प्रा. बाबासाहेब सायमोते म्हणाले,‘‘ गजा त्याच्या नावाप्रमाणेच ठरला. तो आमच्यासाठी कायम मंगल घेऊन आला. किर्ती, एश्वर्य सगळे दिले. मृत्यूपश्चातही स्वतःचे नावलौकीक टिकवून कुटुंबालाही समाजात मान मिळवून देणारा गजानन ठरला.’’

गजाला पुन्हा उभा करण्यासाठी प्राध्यापकांनी घेतलेल्या कष्टाला तोड नाही. मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग गजाचा सांगाडा तयार करण्यासाठी झाला आहे. खऱ्या अर्थाने घेतलेल्या शिक्षणाचा कौशल्यपूर्ण वापर झाला आहे. हा खरा स्कील इंडिया आहे.

-डॉ.नितीन पाटील, कुलगुरु , महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर.

गजा या संकरित बैलाने मृत्यूपूर्वी नावलौकीक मिळवला आहे. आता मृत्यूनंतरही स्वतःची ओळख व ठसा ठेवणारा देशातील एकमेव बैल ठरला आहे. त्याला पुन्हा उभा करण्यासाठी सर्व सहकारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्याचेच हे फळ आहे. या सर्व कार्यादरम्यान अधिष्ठाता डॉ. मिलींद मेश्राम यांचे प्रोत्साहन बळ देणारे ठरले.

-डॉ.शिल्पा साळुंखे- मोडेकर, विभागप्रमुख शरीररचनाशास्त्र विभाग व उतीशास्त्र विभाग

गजा माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी कधी वेगळा नव्हता, तो कायम आमच्यासोबत असणार. पण, गजाला अशाप्रकारे उभा राहिलेला पाहुन आयुष्य सार्थक झाल्याचे वाटले.

-कृष्णा सायमोते , मालक, कसबे डिग्रज (ता.मिरज)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 17 Price : आला रे आला, आयफोन आला! iPhone 17, 17 Pro अन् Pro Max स्मार्टफोन भारतात कितीला? किंमत पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone 17 Series : एकच झलक, सबसे अलग! iPhone 17 झाला लाँच; एकदम खास फीचर्स अन् परवडणारी किंमत, सर्व डिटेल्स पाहा एका क्लिकमध्ये..

iPhone Air Price : कागदासारखा पातळ मोबाईल! iPhone Air लाँच; बघाल तर प्रेमात पडाल, किंमत फक्त...

Apple Watch Series 11 : हे घड्याळ आहे की फीचर्सचा खजिना! Apple Watch Series 11 लाँच, किंमतीपासून अपडेट्स पर्यंत, सर्वकाही जाणून घ्या

AirPods Pro 3 ची धमाकेदार एंट्री; मोजणार हृदयाचे ठोके अन् करणार लाईव्ह ट्रान्सलेशन, 15 जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT