Leopard esakal
सातारा

विंगेत बिबट्यांचा शेळीच्या कळपावर हल्ला; कोकरू जबड्यात पकडून बिबट्या पसार

विंगसह परिसरात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे.

विलास खबाले

विंग (सातारा) : परिसरात बिबट्याची (Leopard) दहशत वाढली आहे. एकाच वेळी दोन बिबट्यांनी अचानक येऊन एका शेळीच्या (Goats) कळपावरच हल्ला चढवला. दिवसाढवळ्या केलेल्या हल्ल्यात कोकरू गायब केले. शेतकऱ्यापासून अवघ्या दहा फुटांवर घटना घडली. त्यानेच बिबट्यांना धुडकावले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (Leopard Attack Goats In Wing Village Satara News)

विंगसह परिसरात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. यापूर्वी रात्री-अपरात्री हल्ल्याच्या घटना समोर येत होत्या. मात्र, दिवसाढवळ्या हल्ले ते आता करू लागले आहेत. मानवी वस्तीत घुसण्याकडे कल त्यांचा वाढला आहे. परवा एका शेळीच्या कळपावर अचानक हल्ला चढवला. येथील कानिफनाथ मंदिर परिसरात घटना घटली. चारा देण्यासाठी शेतकरी निघाला असताना समोरच घटना घडली. अवघ्या दहा फुटांवर घडलेल्या घटनेत दोन बिबटे समोर दिसले. एकाने कोकरू गायब केले. तर अन्य एकाने कोकरू जबड्यात पकडले असताना प्रसंगावधान राखून शेतकऱ्याने त्यास काठीने धुडकावले. आरडाओरडा करत कोकराची सुटका केली. बिबट्यांनी तेथून त्यानंतर पळ काढला.

कास धरणाच्या 'उंची'ला 5 जूनची डेडलाइन; खासदार उदयनराजेंकडून चोख आदेश

Leopard Attack Goats In Wing Village Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईच्या गजबजाटात हरवलेल्या दोन मुलींना शोधण्याची आईची धडपड, पोलिसांची रात्रंदिवस मेहनत

Mahashtra Farmers : अतिवृष्टीमुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, उत्पादनात घट

Pune : आंदोलन करण्यावरून राष्ट्रवादीच्या दोन गटात बाचाबाची; शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की

Uddhav Thackeray : सत्ताधाऱ्यांना माध्यमांनी प्रश्‍न विचारावेत, उद्धव ठाकरे यांची अपेक्षा; भाजपला सोडले की हिंदुत्व जाते का?

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT