सातारा

वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास जबाबदार कोण? साताऱ्यात बिबट्याचा वावर वाढला

Balkrishna Madhale

सातारा : सध्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र शांतता आहे. वर्दळ कमी, रस्ते सामसूम असल्याने वन्यप्राणीही मुक्त संचार करीत आहेत. शहरातील गोळीबार मैदान, रामराव पवारनगर या भागात बिबट्याने नुकतीच हजेरी लावली. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आलेत. त्यानंतर चक्क बिबट्यालाच नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वावर आता शहरा लगतच्या भागात आढळू लागल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
शहरीकरणामुळे वन्यजीवांचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे वन्य आणि मानवातील संघर्ष वाढला आहे. वन्यप्राण्यांकडून मानवाच्या व मानवांकडून वन्यप्राण्यांच्या हत्या होत आहेत. वाढत्या वृक्षतोडीमुळे जंगलाचा ऱ्हास होत आहे. याचा पर्यावरणारही परिणाम होत आहे. जंगलातील पशु-पक्षी व अन्य कीटक यांना निसर्ग त्यांच्या गरजेप्रमाणे अन्न देत असतो. त्यासाठी त्या प्राण्यांची काळजी, रक्षण निसर्गच करतो. आजच्या मानवाला आहाराबरोबर इतर चैन याचा विचार करावा लागतो. हे करीत असताना निसर्ग ऱ्हास पावत आहे. याचा विचार फारच थोडे लोक करत आहेत. आजचे मानवी जीवन धकाधकीचे, प्रदूषणाचे, मानसिक ताण-तणावाचे, नवनवीन रोगाचे आपणच निर्माण केले आहे. आपणच प्रश्न निर्माण करावयाचे व ते सोडविण्यासाठी निसर्गाला वेठीस धरावयाचे. आम्ही फक्त खाण्यापुरताच विचार करून चाललो आहोत. मानवी शरीर ही नुसती केमिकल लॅबोरेटरी आहे. ती चालू ठेवण्यासाठी काहीना काही खाद्य आपण शरीराला भरवत आहोत; पण हीच खाद्य ज्या निसर्ग नियमाने तयार झाली आहेत त्याचा विचार आपण करताना दिसत आहे. आज बिबट्याचा मुक्त संचार मानवीवस्तीकडे होताना दिसत आहे. कारण, मानवाकडून झालेली जंगलतोड, वृक्षतोड, जंगलामध्ये झालेलं अतिक्रमण यामुळे वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे वाटचाल पाहायला मिळत आहे. आज राज्यात सरकारकडून वृक्षसंवर्धनाबरोबर प्राणी संवर्धन होणे गरजेचे असून यामुळे मानवी वस्तीकडे होणार प्राण्यांचा वावर रोखता येईल.

Video: बिबट्या शिकार घेऊन किती वेळा आदळला पाहाच...

आज प्राणिमात्रांवर होणारे हल्ले बरेच वाढले आहेत, त्यामुळे अशा बिबट्या, साळींदर, कोल्हा, गवा, रानडुकरे, अस्वल, सांबर आदी प्राण्यांची उपासमार होत असून त्यांनी मानवी वस्तीकडे जाण्याचा मार्ग पत्करला आहे. त्यातच मानवाने असंख्य झाडांची कत्तल करून प्राण्यांना बेघर केले असून त्याचीच किंमत म्हणून प्राणिमात्रांनी शहर परिसरात मुक्त संचार चालवला आहे.  आज वनविभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून होणारी वृक्षतोड थांबली पाहिजे, अन्यथा जंगलातील अनेक प्राण्यांचा वावर हा लोकवस्तीत पाहायला मिळेल, शिवाय अतिक्रमणाला देखील आळा घालणे जरुरीचे असून प्राण्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे. जर असे नाही केले तर शहरात प्राण्यांचा मुक्त संचार असाच सुरू राहील! 

मुख्याधिकाऱ्यांना पडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा विसर

धोका वाढला, जबाबदार कोण? 

वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, हळूहळू ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी प्रमुख कारणांसह जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्‍यात येत असलेला प्राण्यांचा निवारा आदी कारणांमुळे जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना धोका निर्माण होऊ लागला असल्याने याला नक्की जबाबदार कोण? असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना उपस्थित करत आहे. 

धाडसी निर्णय..! आता कोरोना रुग्णांवर घरच्या घरी उपचार, सातारकरांनाे अटी वाचा

नागरिकांनो अशी घ्या काळजी

आवश्‍यकता असेल तरच संध्याकाळी बाहेर पडा. 
किल्ले अजिंक्‍यतारा परिसरात दक्षिण दरवाज्याकडून जाणे टाळा.
ज्या भागात बिबट्याचा वावर आढळतो, तेथे वनविभागास सापळा लावण्याची मागणी करावी.
वनविभागाने सातत्याने बिबट्याचा वावर असणारी ठिकाणांची नागरिकांना माहिती द्यावी.

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

Video : 20 लाखांची गाडी पण मनाने भिकारी! डिझेल भरल्यानंतर ड्रायवर पंपावरून पळाला, पेट्रोल भरणारा कासावीस होऊन मागे धावला अन्...

SCROLL FOR NEXT