Leopard Cages Sakal
सातारा

कऱ्हाड : किरपेतील शिवारात तीन ते चार बिबटे; वन विभागाकडून तीन पिंजऱ्यांची व्यवस्था

पाच वर्षांच्या चिमुकल्या राज देवकरवर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याने किरपे गाव चर्चेत आले आहे.

हेमंत पवार

पाच वर्षांच्या चिमुकल्या राज देवकरवर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याने किरपे गाव चर्चेत आले आहे.

कऱ्हाड - किरपेतील (Kirape) शिवारात तब्बल तीन ते चार बिबटे (Leopard) असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे. बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी वन विभागाने त्या परिसरात त्याचा माग काढून शिवारातील वेगवेगळ्या ठिकाणी तीन पिंजरे (Cages) लावले आहेत. त्याचबरोबर बिबट्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅप कॅमेरेही लावण्यात आले आहेत.

पाच वर्षांच्या चिमुकल्या राज देवकरवर बिबट्याने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याने किरपे गाव चर्चेत आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यानंतर वन विभागाने पूर्ण ताकदीनिशी संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठीची कार्यवाही वन अधिकारी अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे. दरम्यान, वन विभागाने त्या परिसराचा माग काढून बिबट्याचे वास्तव्य असलेल्या परिसराचा अभ्यास केला आहे. त्यानंतर त्या परिसरात तब्बल चार बिबटे असल्याचे प्राथमिक पाहणीत दिसून आले आहे.

या बिबट्यांचा वावर येणके-किरपे- दक्षिण तांबवे- तांबवेदरम्यान असल्याचेही दिसून येत आहे. वन विभागाने भविष्यातील धोका ओळखून आणि अन्य एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी त्या परिसरात तीन पिंजरे लावले आहेत. त्याचबरोबर त्या परिसरातील बिबट्याच्या हालचाली दिसून याव्यात, यासाठी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. त्याद्वारेही वन विभागाकडून त्याची टेहेळणी करणे सुरू आहे.

किरपेत शेळीवरील हल्ला

किरपेतील कोयना नदीकाठच्या शिवारात आज दुपारीच बिबट्याने एका शेळीवर हल्ला चढवला. बिबट्या शेळीला जबड्यात धरून घेऊन जात असतानाच शेतकऱ्यांनी आरडाओरडा केला. बिबट्याकडून ती शेळी पाण्यात पडली. त्यामुळे बिबट्याने शेळीला सोडून तेथून धूम ठोकली. त्यामुळे त्या परिसरात पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT