leopard
leopard  sakal
सातारा

सातारा : वाठारमधे वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हा़ड : अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. पुणे-बंगळुरू महामार्गावर कऱ्हाड तालुक्यातील वाठार गावाजवऴ आज पहाटे पाचच्या सुमारास प्रकार उघडकीस आला. रात्री उशिरा वाहनाने धडक दिल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला पहाटे साडेपाचच्या सुमारास बामणोलीचे वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनिस यांना महामार्गवर वाठार जवळच्या उड्डाण पुलाजवळ बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे असा फोन आला. त्यांनी ती माहिती तत्काळ कऱ्हाडचे वन क्षेत्रपाल तुषार नवले व मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांना दिली. वनक्षेत्रपाल व त्यांचे पथक वाठार येथे पोचले. तेथे पाहणी केली असता बिबट्या मृत अवस्थेत रस्त्यावर पडलेला दिसला. स्थळ पंचनामा केला. (leopard was killed on the spot when it was hit by an unknown vehicle)

त्वरीत त्याचेल पशुसंवर्धन अधिकारी डॉ बोर्डे व सहकाऱ्यांनी यांनी शवविच्छेदन केले. मृत बिबट्या पूर्ण वाढ झालेली आहे. त्याचे जन साधारण 45 किलो तर वय पाच असावे, असा अंदाज वन विभागाने व्यक्त केला. त्याच्या डाव्या बाजूच्या कंबरेवर जोरात वाहनाने जोरात धडक दिल्याचे स्पष्ट दिसते आहे. मार जोराचा लागल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदनात स्पष्ट झाले.बिबट्याचे अन्य अवयव सुस्थितीत होते. सहायक वनसंरक्षक महेश झंझुरणे वनक्षेत्रपाल तुषार नवले , मानद वन्यजीव रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील, आदी वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले.(department of animal husbandry)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

Revoting: दोन गटांतील हाणामारीत 'ईव्हीएम'ची तोडफोड, 'या' राज्यात फेरमतदानाला सुरूवात

Latest Marathi News Live Update: ठाकरे गटाचे उमेदवार आज दाखल करणार अर्ज

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

World Hunger : काही देशांच्या युद्धामुळे जगभरात वाढले उपासमारीचे संकट; काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT