Little kids Trip to Pratapgad fort on stick Mahabaleshwar satara sakal
सातारा

काठ्यांच्या आधारावर प्रतापगड सफर

दरेतील चिमुरड्यांच्या अनोख्या कौशल्याचे कौतुक; शिक्षक गोफणेंचे मार्गदर्शन

सुनील शेडगे

नागठाणे : लहान मुले म्हणजे चैतन्याचा, उत्साहाचा धबधबाच. वैविध्यपूर्ण कसरती करण्यातही ती पारंगत असतात. त्याचीच प्रचिती देताना दरे (ता. महाबळेश्वर) येथील चिमुरड्यांनी काठ्यांवर चालण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यातून त्यांनी प्रतापगडची सफरही अनुभवली. क्षेत्र महाबळेश्वरमधून उगम पावणाऱ्या‍ कोयना नदीतीरावरील आरंभीचे गाव म्हणजे दरे. सुमारे दीडशेच्या घरातील इथली लोकसंख्या. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. राजेंद्र गोफणे हे या शाळेतील हरहुन्नरी शिक्षक. बॅडमिंटनमधील ते निष्णात खेळाडू. कोरोना काळात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी गावाला मदतीचा मोठा हातभार लावला होता.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेतील बहुतांश मुले काठीवर चालण्यात पारंगत बनली आहेत. काठीवर चढणे, तोल सांभाळून चालणे ही कौशल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत. ही सारी मुले सहा ते दहा वर्षे वयोगटातील आहेत. या मुलांनी सपाट रस्त्याबरोबरच उंच पायऱ्यां‍वरही काठीवर चालण्याचे कसब प्राप्त केले आहे. त्यासाठी सातत्याने केलेला सराव महत्त्वपूर्ण ठरला. अलीकडेच या मुलांनी प्रतापगडावर आपल्यातील या आगळ्या कौशल्याचे दर्शन घडविले. चिमुरड्यांची ही कसरत पाहून गडावर आलेले दुर्गप्रेमी, पर्यटकही अचंबित झाले. त्यांनी मुलांचे कौतुक केले.

मुख्याध्यापिका वैशाली कदम, अर्चना तळेकर, जयराज जाधव यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख डी. एम. जाधव, गजानन धुमाळ, जयवंत जाधव तसेच ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

येत्या काळात प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत काठीवर चालत जाण्याचे मुलांचे उद्दिष्ट आहे. काही ठिकाणी पायऱ्यां‍ची उंची जास्त आहे. मात्र, सराव अन् मुलांच्या निश्चयाने ते शक्य होईल.

- राजेंद्र गोफणे, मार्गदर्शक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT