Cow Smuggling esakal
सातारा

Cow Smuggling : कत्तलीसाठी दुभत्या गायींची अवैध वाहतूक; गाडी पलटी झाली अन् समोर आली धक्कादायक बाब..

गायी कमी जागेमध्ये निर्दयपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्या.

सकाळ डिजिटल टीम

अंधाराचा फायदा घेऊन गायींनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त करून वाहनातील तिन्ही गायींच्या चारापाण्याची सोय पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारातच केली.

पुसेगाव/बुध : डिस्कळ-चिंचणी मार्गावरील डिस्कळ (ता. खटाव) हद्दीत गोवंश (Cow) तस्करी करणारे वाहन नाल्यात पलटी झाले. या अपघातामुळे प्रवासी वाहनातून कत्तलीसाठी अवैध गोवंश वाहतूक करण्यात येत असल्याचे समोर आले. तसेच या अपघातामुळे का होईना; पण तीन दुभत्या गायींचे प्राण वाचले.

शुक्रवारी (ता. १२) रात्री ११ वाजण्‍याच्‍या सुमारास गायींना कतलीसाठी घेऊन जाणारी वाहन क्रमांक (एमएच १२ सीवाय ५६८७) हे डिस्कळ गावच्या हद्दीतील डिस्कळ-चिंचणी रोडवरील गोडसे वस्ती येथील सयाजी बाबूराव गोडसे यांच्या गोठ्याजवळील नाल्यात चालकाचे नियंत्रण सुटून एका बाजूस पलटी झाली. बातमीदारामार्फत या घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिसांनी (Pusegaon Police) घटनास्थळी तत्काळ धाव घेतली.

यावेळी प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनात एक देशी गाय, एक गीर जातीची गाय, एक जर्सी गाय अशा एकूण तीन गायी कमी जागेमध्ये निर्दयपणे कोंबून भरलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळल्या. तिन्ही गायींचे चारी पाय व तोंड रस्सीने बांधल्याने या गायी जखमी व अशक्त झाल्या होत्या. पोलिसांनी तातडीने स्थानिकांच्या मदतीने या गायींना बाहेर काढून प्राथमिक उपचार केले. कतलीसाठी नेण्यात येणाऱ्या या गायी दुभत्या असल्याचे भयाण वास्तव यावेळी समोर आले.

दरम्यान, अंधाराचा फायदा घेऊन गायींनी भरलेले वाहन सोडून चालक पसार झाला होता. पोलिसांनी हे वाहन जप्त करून वाहनातील तिन्ही गायींच्या चारापाण्याची सोय पुसेगाव पोलिस ठाण्याच्या आवारातच केली. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल विलास घोरपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार आनंदा गंबरे हे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT