Ajit Pawar sakal
सातारा

Loksabha Election : लोकसभेच्या महाराष्ट्रातील जागा वाटपाबाबत अजित पवार काय म्हणाले?

लोकसभेच्य जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसलो होतो. बहुतेक सिटींग जागा ज्या-त्या पक्षाला सोडायची प्राथमिक चर्चा झालेली आहे.

- हेमंत पवार

कऱ्हाड - लोकसभेच्य जागा वाटपासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसलो होतो. बहुतेक सिटींग जागा ज्या-त्या पक्षाला सोडायची प्राथमिक चर्चा झालेली आहे. साधारण प्रत्येकाचा मानसन्मान राखला जावुन तोडगा काढण्यात येवुन जागा वाटप होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री अजिज पवार यांनी आज येथे व्यक्त केली.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या १११ व्या जयंतीनिमीत्त उपमुख्यंत्री पवार आज येथील त्यांच्या समाधीस्थळी राज्य सरकारच्यावतीने अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यादरम्यान ते माध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, आमदार दीपक चव्हाण, माजी आमदार आनंदराव पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील, अॅड. आनंदराव पाटील, सादीक इनामदार, जितेंद्र डुबल आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, राजकारणात सुसंस्कृतपणा कसा टिकवायचा, कसा साभाळुन कामकाज करायचे हे यशवंतराव चव्हाण यांनी दाखवले. त्यांनी केंद्रात उपपंतप्रधान, केंद्रात अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेते महणुन आणि मुख्यमंत्री म्हणुन दाखवले आहे.

लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आणि साताऱ्याच्या ऱाष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जागेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात दिल्लीत काल बैठक होणार होती. भाजपचे पार्लमेंटरी बोर्ड जागा वाटपासंदर्भात चर्चेसाठी बसणार होते. त्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकलली आहे. ती आज किंवा उद्या होवु शकते.

जागा वाटपासदंर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आणि भाजप आम्ही तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसुन प्राथमिक चर्चा केली आहे. त्यात बहुतेक सिटींग जागा ज्या-त्या पक्षाला सोडायची अशी प्राथमिक चर्चा झालेली आहे. साधारण प्रत्येकाचा मानसन्मान राखला जावुन तोडगा काढण्यात येवुन जागा वाटप होईल, अशी आशा उपमुख्यमंत्री अजिज पवार यांनी आज येथे व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day Live Update : जागतिक बाजारपेठेत भारतीय उत्पादनांसाठी मोठी संधी; लघु उद्योगांना पंतप्रधान मोदींचे आवाहन

Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! रविवारी लोकल उशिराने धावणार, 'या' मार्गावर मेगाब्लॉक; कसे असेल नियोजन?

Koyna Dam Water Level : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर! कोयना धरणात 97 टीएमसी पाणीसाठा; सांगली-सातारा अन् कर्नाटकाची चिंता मिटली

IND vs SL: भारत खेळणार 600वा कसोटी सामना; ‘या’ दोन संघांनंतर ऐतिहासिक क्लबमध्ये होणार एंट्री, कोणत्या देशाने खेळले 1000हून अधिक सामने!

Vishwas Nangare Patil: विश्‍वास नांगरे पाटील यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, रेड्डींसह दहा पोलिस होणार सन्मानित

SCROLL FOR NEXT