Loksabha Election Sharad Pawar Satara esakal
सातारा

शरद पवारांच्या मित्राच्या उमेदवारीलाच पक्षातून तीव्र विरोध; साताऱ्याच्या उमेदवारीवर पवारांची 'वेट ॲण्ड वॉच' भूमिका

सध्यातरी सातारा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत श्रीनिवास पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पाटणकरांकडून श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीस विरोध झाल्याचे सांगण्यात आले. खासदार शरद पवार यांनी सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय देण्याचे टाळले.

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सातारा (Satara) लोकसभेचा उमेदवार ठरविण्यासाठी मुंबईत काल झालेल्या बैठकीत श्री. पवार यांनी सर्वांची मते जाणून घेतली. यामध्ये श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) हेच प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी पक्षातून त्यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे. त्यामुळे कोणाच्या नावावर शिक्का मोर्तब होणार याची उत्सुकता आहे.

महायुतीत साताऱ्याची जागा कोणाला सुटणार यावर खासदार शरद पवार आपला उमेदवार ठरवणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पवारांनी आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाची सातारा लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरविण्यासाठी काल मुंबईतील सीझन फोर हॉटेलवर बैठक झाली. या बैठकीस खासदार शरद पवार (Sharad Pawar), प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

यावेळी साताऱ्यातून खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, आमदार बाळासाहेब पाटील, सारंग पाटील, सुनील माने, सत्यजित पाटणकर उपस्थित होते. सुरुवातीला सर्व इच्छुकांची मते खासदार शरद पवार यांनी जाणून घेतली. यामध्ये सारंग पाटील, श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने यांनी आपापली भूमिका मांडून आपण सातारा मतदारसंघासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

सध्यातरी सातारा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीत श्रीनिवास पाटील हे प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी त्यांना पक्षांतर्गत विरोध होत आहे. त्यांच्याऐवजी सारंग पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी खुद्द श्रीनिवास पाटील यांनी पवार यांच्यापुढे केली आहे, तर सुनील माने यांनी तरुण उमेदवार म्हणून आपणास संधी देण्याची मागणी केली, तर सत्यजित पाटणकर यांनीही आपण इच्छुक असल्याचे सांगितले.

यावेळी पाटणकरांकडून श्रीनिवास पाटील यांच्या उमेदवारीस विरोध झाल्याचे सांगण्यात आले. खासदार शरद पवार यांनी सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय देण्याचे टाळले. कारण महायुतीत साताऱ्याची जागा कोणाकडे जाणार यावर खासदार शरद पवार आपला उमेदवार ठरविणार आहेत. त्यामुळे श्री. पवार यांनी वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांनी जाणून घेतली इच्छुकांची मते

सारंग पाटील, श्रीनिवास पाटील, सत्यजित पाटणकर, सुनील माने इच्छुक

श्रीनिवास पाटील प्रबळ दावेदार मात्र पक्षातून विरोध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM kisan 22nd Installment : पंतप्रधान मोदी आज 'पीएम किसान' चा २२ वा हप्ता जारी करणार; तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? असं चेक करा

Phaltan News: पाइपमध्‍ये अडकून तिघांचा मृत्‍यू; फलटण तालुक्यातील पाेटपाटातील घटना, तिघेही ओरिसातील पाेल्‍ट्री कामगार, काय घडलं!

Dharashiv News: उमरग्यात गॅससाठी लांब रांगा; बुकिंग केल्यानंतरही १५ दिवस प्रतीक्षा;सिलिंडर उशिरा मिळत असल्याने ग्राहक त्रस्त

Parbhani Gas Booking Trouble: गॅस सिलिंडर बुकिंग सर्व्हर डाउन, ऑनलाइन नोंदणी ठप्प, परभणी गॅस एजन्सी गर्दी

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

SCROLL FOR NEXT