Loksabha Elections Udayanraje Bhosale Chandrashekhar Bawankule esakal
सातारा

Loksabha Election : लोकसभा तोंडावर असतानाच उदयनराजे भाजपवर नाराज? बावनकुळे म्हणाले, त्यांच्या मनात कुठलीही..

कोण कुठे लढणार आहे, हे आम्हाला महत्त्वाचं नाही. आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत.

किरण बोळे

आम्ही राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू व त्यामध्ये नांदेडसह बारामतीचाही समावेश असेल,’’ असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.

फलटण शहर : खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) हे नियमितपणे माझ्याशी बोलत असतात, त्यामुळे माझ्या व पक्षाबाबत त्यांच्या मनामध्ये कुठलीही नाराजी नाही, असे सांगत तिकीट मागण्याचा अधिकार पक्षाच्या बूथ कार्यकर्त्यालाही भाजपमध्ये आहे. कारण तो पक्षाचे व समाजाचे काम करत असतो, त्यामुळे ज्यावेळी पक्षाकडून उमेदवारीचा निर्णय होतो, तेव्हा आमचे सर्व कार्यकर्ते कामाला लागतात, असे भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

फलटण येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. लोकसभेच्या जागांवर मित्रपक्षांनी दावा करणे, हे युतीच्या राजकारणामध्ये होत असते; परंतु अद्याप केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाने कुठले सीट कोणाला जाईल, याबाबत चर्चा केली नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे आमचे राज्यातील नेते व केंद्रीय नेतृत्व बसून याबाबत निर्णय घेतील व जो निर्णय होईल त्याबाबत कोणाच्याही मनामध्ये किंतू परंतु नसेल, असे बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘कोण कुठे लढणार आहे, हे आम्हाला महत्त्वाचं नाही. आम्ही जिंकण्यासाठी लढणार आहोत. मित्रपक्षांच्या उमेदवारांपाठीमागे भाजप पूर्ण ताकदीने उभा राहील, तर भाजपच्या उमेदवारांच्या मागे आमच्या महायुतीतील ११ पक्ष ताकदीने उभे राहतील, त्यामुळे आम्ही राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकू व त्यामध्ये नांदेडसह बारामतीचाही समावेश असेल,’’ असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी केला.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपच मारणार बाजी

माढा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत. सर्वांत जास्त विकासकामे आणणाऱ्या देशातील पहिल्या दहा खासदारांमध्ये निंबाळकर यांचा समावेश आहे, असे निदर्शनास आणून देत माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये बुथनिहाय ५१ टक्के मते घेऊन महायुतीचा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल, असेही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT