Lokshahi Aghadi esakal
सातारा

पालकमंत्र्यांच्या 'लोकशाही'चा पालिका निवडणुकीत स्वबळाचा शड्डू!

सिद्धार्थ लाटकर/ सचिन शिंदे

कऱ्हाड (सातारा) : पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांच्या नेतृत्वाखालील पालिकेतील लोकशाही आघाडीत (Lokshahi Aghadi) खांदेपालट झाली आहे. आघाडीची नवी कार्यकारणी मावळते अध्यक्ष सुभाष पाटील (Subhash Patil) यांनी जाहीर केली. आघाडीच्या अध्यक्षपदी जयंत पाटील यांची निवड झाल्याचे त्यांनी नुकतेच घोषित केले. अॅड. विद्याराणी साळुंखे, डॉ. सतीश शिंदे असे दोन उपाध्यक्ष आहेत. नरेंद्र पवार यांची सचिव, मुस्सदिक अंबेकरी यांची सहसचिव, रविंद्र मुंढेकर यांची खजिनदार तर राकेश शहा यांची सहखजिनदार म्हणून निवड झाली. या आघाडीत ५७ मार्गदर्शक तर ६४ संघटकांची निवड झाली आहे. (Lokshahi Aghadi Executive Committee Announced For Karad Municipal Election Satara Political News)

लोकशाही आघाडी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची घोषणा लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनी नुकतीच जाहीर केली.

लोकशाही आघाडी कार्यकारिणीच्या अध्यक्षपदाची घोषणा लोकशाही आघाडीचे नेते पाटील यांनी जाहीर केली. वेगवेगळ्या विचारांचे व पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा आघाडीत सहभाग आहे. आघाडी पूर्ण ताकदीने सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढणार आहे, असेही घोषित केले. आघाडीच्या नव्या कार्याकारणीत सुभाष पाटील यांच्यासह शहरातील विविध लोकांचा मार्गदर्शक म्हणून समावेश आहे. मुकुंद कुलकर्णी, अशोकराव डुबल, संभाजी सुर्वे, विलास कुंभार, कमलाकर कांबळे, दीपक बेलवणकर, बाबासाहेब भोसले, बबनराव भोजगावंकर, नंदकुमार बटाणे, जगन्नाथ माने, भाऊसाहेब शिंदे, हेमंत ठक्कर, शरद मुंढेकर, महंमद चाँद बागवान, उदय हिंगमिरे, महादेव पाटील, इसाक सवार, शौर्यशिल खामकर, संजय पवार, गंगाधर जाधव.

तसेच सुरेश शेजवळ,अॅड. सतीश पाटील, अॅड. प्रताप पाटील, उमा हिंगमिरे, श्रीमती अरुणा जाधव, सुनंदा शिंदे, अनिता पवार, पल्लवी पवार, जयंत बेडेकर, गजानन फल्ले, राजेंद्र माने, राजीव मोहिते, अब्दुल सुतार, चंद्रकांत पाटील, प्रमोद थोरवडे, आनंदराव शिंदे, विजय कांबळे, अनिल वाघमारे, सुनिल पवार, राजेंद्र मेहता, अर्जुन पवार, इकबाल मुजावर, रमेश सातुरे, रामभाऊ शेलार, राजेंद्र काटवटे, शामराव मुळे, राजेंद्र शहा, संजय तवटे, प्रकाश वास्के, अख्तर आंबेकरी, रामभाऊ शिंदे, दाऊद आंबेकरी, अहमंद मुल्ला, अभिजीत सूर्यवंशी, श्रीधर मुळे, लक्ष्मण चव्हाण, आनंदा चौगुले, अमृत देशपांडे मार्गदर्शक आहेत. आघाडीच्या संघटकपदी संघटक सौरभ पाटील यांची निवड झाली आहे. त्यासोबत ६४ संघटकांची निवड झाली आहे. त्यात आजी-माजी नगरसवेकांसह विविध पक्षातील युवकांचाही समावेश आहे.

Lokshahi Aghadi Executive Committee Announced For Karad Municipal Election Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT