Lonandanagari ready for Maulis welcome 
सातारा

माउलींच्‍या स्‍वागतासाठी लोणंदनगरी सज्ज

दहा दिवस यंत्रणा झटून कामात; नगरपंचायतीतर्फे पालखी तळ स्वच्छतेच्या उपाययोजना

सकाळ वृत्तसेवा

लोणंद - श्री संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा मंगळवारी (ता. २८) लोणंद येथे अडीच दिवसांच्या मुक्कामासाठी येत आहे. पालखी सोहळ्यातील वारकरी व भाविकांना स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, सुरक्षा आदी विविध प्रकारच्या सोयी-सुविधा पुरवण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणा, विविध संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी गेल्या दहा दिवसांपासून येथे अहोरात्र झटून जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे लोणंदनगरी माउलींच्या स्वागतासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे. माउलींच्या आगमनाची आस संपूर्ण जिल्ह्याला लागली आहे.

नगरपंचायतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून गावातील मोकळ्या जागेत दिंड्या उतरणाऱ्या ठिकाणच्या वेड्या बाभळी व झाडेझुडपे तोडून स्वच्छता केली आहे. सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या व गटारे यांची स्वच्छता केली आहे. जंतुनाशक पावडर व डासांच्या बंदोबस्तासाठी फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी केली जात आहे. गावातील व पाडेगाव येथील जलशुध्दीकण केंद्रावरील सर्व पाण्याच्या टाक्या धुवून व विद्युत मोटारींची व जलवाहिन्‍यांची दुरुस्ती करून नळ पाणीपुरवठ्याची यंत्रणा सज्ज ठेवली आहे. शुध्द पाणीपुरवठ्यासाठी टीसीएल व तुरटीचा पुरसा साठा उपलब्ध केला आहे. पालखी तळावर मुरमीकरण व कच टाकून संपूर्ण तळाचे सपाटीकरण करण्यात आले आहे. खेमावती नदीची स्वच्छता करण्यात आली.

नगराध्यक्षा मधुमती गालिंदे-पलंगे व उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके-पाटील यांनी आज (ता.२६) शहरात विविध ठिकाणी भेटी देवून तयारीची पाहणी केली. त्यावेळी नगरसेवक सचिन शेळके, भरत शेळके, रवींद्र क्षीरसागर, सागर शेळके, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, नगर अभियंता सागर मोटे, कार्यालयीन अधीक्षक शंकर शेळके, विजय बनकर, अॅड. गजेंद्र मुसळे, असगर इनामदार, अॅड. गणेश शेळके, वैभव खरात, सागर गालिंदे, ओंकार शेळके, गौरव फाळके, रोहन धायगुडे, सनी टेंगले, सूरज मोहिते आदी उपस्थित होते.

वीर पाटबंधारे विभागाने आजपासून नीरा उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडले आहे. नीरा नदीपात्रातही दत्तघाटावर स्नानाच्या ठिकाणी पिंपरे बुद्रुक येथून उजव्या कालव्यातून पाणी सोडले आहे. मात्र, तांबवे धरणातून अद्यापही सरहद्देच्या ओढ्यात पाणी सोडले नाही. या धरणातून पाणी सोडण्याची मागणी नगरपंचायतीने केली आहे.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, वीज वितरण कंपनी, पोलिस यंत्रणा, एसटी महामंडळ, दूरध्वनी विभागासह अन्य सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणा, संस्था, संघटना व मंडळे यांनी जोरदार तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून येथे छोटे-मोठे स्टॉलधारक, मिठाईवाले यांनी दुकाने थाटल्याने लोणंदनगरी गजबजली आहे.

पाळणे, खेळण्‍यांना परवानगी नाकारली

येथे श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने गोटेमाळनजीक कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता उभारण्यात येत असलेल्या मोठे पाळणे, खेळणी लावण्यास प्रशासनाने आज (ता.२६) परवानगी नाकारल्याने केवळ मनगटशाही व मन मानेल तसे वागणाऱ्या प्रवृत्तीना चांगली चपराक दिली आहे. निम्‍म्याच्यावर पाळणे खेळणी उभारण्याचे काम झाले आहे. मात्र, तत्पूर्वीच प्रशासनाने परवानगी नाकारल्याने या व्यवसायाशी हात असणाऱ्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत.

पालखी सोहळ्‍यात कोरोनाची काळजी घ्‍या : जिल्हाधिकारी

लोणंद : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याची जिल्हा प्रशासनाकडून विविध पातळ्‍यांवरून सर्व ती जय्यत तयारी झाली आहे. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. कोरोनाची काळजी घेऊन पालखी सोहळा परंपरेनुसार भक्‍तिमय व आनंदी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याच्‍या पार्श्वभूमीवर नीरा दत्तघाट, पाडेगाव स्वागत स्थळ, लोणंद-नीरा पालखी मार्ग व लोणंद पालखी तळाला भेटी देऊन त्यांनी आज (ता. २६) नगरपंचायत व प्रशासनानाने केलेल्या तयारीची पाहणी केली. त्यावेळी ते लोणंद येथे बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ काळे, मुख्यधिकारी संजय गायकवाड, नगर अभियंता सागर मोटे, निवासी नायब तहसीलदार चेतन मोरे, नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, मंडलाधिकारी रूपाली यादव, तलाठी पिंकी वझे आदी प्रमुख उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT