Turmeric
Turmeric esakal
सातारा

साताऱ्यात दराअभावी हळदीच्या क्षेत्रात घट; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

अमोल जाधव

रेठरे बुद्रुक (सातारा) : कृष्णाकाठच्या वडगाव हवेली येथील शिवारात सर्वाधिक हळदीची लागवड (Turmeric cultivation) होते; परंतु दिवसेंदिवस हळदीचे दर ढासळत चालल्याने शेतकऱ्यांची (Farmer) निराशा होत आहे. वाढलेला उत्पादन खर्च व मिळणारे उत्पन्न याचा ताळमेळ बसत नसल्याने हळदीचे क्षेत्र घटत चालले आहे. त्यामुळे हळद पिकवणारे गाव म्हणून ओळख असणाऱ्या गावासच ग्रहण लागले आहे. Loss Of Turmeric Crop Due To Lack Of Rates At Rethare Budruk Satara Marathi News

कृष्णाकाठपासून पूर्वेस डोंगर उतारावर वडगाव हवेलीची बहुतांश शेती आहे. निचरा होणारी शेती हळद पिकास पोषक असल्याने तेथे गेल्या 50 वर्षांपासून हे पीक घेतले जाते.

कृष्णाकाठपासून पूर्वेस डोंगर उतारावर वडगाव हवेलीची बहुतांश शेती आहे. निचरा होणारी शेती हळद पिकास पोषक असल्याने तेथे गेल्या 50 वर्षांपासून हे पीक घेतले जाते. 20 वर्षांत सिंचन क्षेत्र वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. हळद पीक घेणारे गाव म्हणून ख्याती असली, तरी सध्या मात्र या परंपरेला तेथील शिवारात खंड पडताना दिसत आहे. पिकाचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे.

Turmeric cultivation

त्यातच मजुरांचा तुटवडा, महाग होत चाललेली खते, औषधे आणि त्यातच हळदीला बाजारपेठेत अपेक्षित दर मिळत नसल्याने हे पीक न पडरवडणारे झाले आहे. त्याचबरोबर काढणी पश्‍चात होणारा खर्चही शेतकऱ्यांना न पेलणारा झाला आहे; परंतु दर चांगला मिळेल, या अपेक्षेने शेतकरी हे पीक घेत आहेत. मात्र, चार ते पाच वर्षांत बाजारपेठेत दर मिळत नाहीत. त्यामुळे मिळणारे उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ बसत नाही. परिणामी हे पीक केवळ हळदीस योग्य दर मिळत नसल्याने परवडत नाही. अशा स्थितीत हळद लागवडीखालील क्षेत्र घटत चालले आहे.

हळदीला दर मिळत नाही. मजुरीचे दरही वाढले आहेत. मार्केटमध्ये दर नसल्याने पिकाचे गणित चुकत आहे. वडगाव हवेलीत 150 एकरांवर हळद असून, पूर्वी दुप्पट लागवड व्हायची.

-सत्यवान जगताप, वडगाव हवेली

Loss Of Turmeric Crop Due To Lack Of Rates At Rethare Budruk Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT