सातारा : दैनिक "सकाळ' हे सर्वसामान्य माणसांच्या हक्काचे व्यासपीठ आहे. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, समस्या दैनिकातून मांडत असतानाच "सकाळ'ने महिलांना केंद्रित करत अनेक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमांमुळे महिलांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे. असाच महिलांसाठी विकासात्मक "मैत्रीण' हा उपक्रम "सकाळ'ने सुरू केला असून, त्यात सर्व महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा माधवी कदम यांनी दै. "सकाळ'च्या कार्यालयात केले.
या वेळी नगराध्यक्षा कदम यांच्या हस्ते मैत्रीण उपक्रमाच्या प्रवेशिकांचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी उद्योजिका अंजली देशपांडे, सौंदर्यतज्ज्ञ स्वाती ओक, सामाजिक कार्यकर्त्या रेणू येळगावकर, "सकाळ'चे सहयोगी संपादक राजेश सोळसकर, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, मुख्य बातमीदार प्रवीण जाधव, वितरण विभागप्रमुख अजिंक्य करपे आदी उपस्थित होते.
चारुदत्त आफळेंना सातारा भूषण पुरस्कार जाहीर
नगराध्यक्षा कदम म्हणाल्या, ""सकाळ' नेहमीच विविध प्रश्न आणि समस्या हाती घेऊन त्याला भिडत असतो. कोरोना, त्यानंतरचा लॉकडाउन यामुळे समाजातील सर्वच स्तरात अस्वस्थता, एकाकीपणा आला होता. ही अस्वस्थता, एकाकीपणा दूर करण्याचे काम लॉकडाउनच्या काळात "सकाळ'ने विविध उपक्रमांतून केले आहे. विविध विषयांना लक्ष करत "सकाळ'ने महिलांना मधुरांगणच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांतून महिलांचा सर्वांगीण विकास होत असतानाच "मैत्रीण' हा आणखी एक उपक्रम "सकाळ'ने सुरू केला आहे.
या उपक्रमातून महिलांच्या ज्ञानाची भूक भागणार असून, त्याचबरोबर त्यांना भरघोस बक्षिसेसुद्धा मिळणार आहेत.'' "मैत्रीण' या उपक्रमात मी स्वत: सहभागी होणार असून, जिल्ह्यातील सर्व महिलांनीसुद्धा त्यात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी केले.
फुलांच्या सुगंधाने दरवळणार शेरे; माउलीकडून तब्बल 1800 फुलझाडांचे रोपण
मैत्रीण उपक्रमाबाबत माहिती देताना सहयोगी संपादक राजेश सोळसकर म्हणाले, ""सकाळ'च्या माध्यमातून महिलांसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. सर्वच स्तरातील महिलांना केंद्रित करत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो. दैनिक व उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सर्वांच्या संपर्कात असतो. कोरोना, लॉकडाउन या कारणांमुळे काहीकाळ संवाद आणि संपर्क प्रक्रिया खंडित झाली होती. ही प्रक्रिया हळूहळू पूर्वपदावर आणण्यात येत आहे. महिला आणि सकाळ यांच्यातील संवाद आणि संपर्क प्रक्रिया पूर्ववत व्हावी, यासाठी मैत्रीण हा उपक्रम राबविण्यात येत आहे. दररोजच्या अंकात विविध विषयांना समर्पित लेख त्यात देण्यात येत असून, त्यावर आधारित एक प्रश्न दररोज महिलांना विचारण्यात येत आहे. साठ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यापैकी किमान 50 प्रश्नांची उत्तरे महिलांनी देणे आवश्यक असून, ती प्रवेशिकेवर चिकटवणे आवश्यक आहे. यासाठीच्या प्रवेशिका वितरकांच्या मदतीने पोचविण्यात येत आहेत.'' पारंपरिक प्रवेशिकांबरोबर या वेळी या उपक्रमासाठी "सकाळ ऍक्टिव्ह' हे ऍप विकसित करण्यात आले आहे. या ऍपच्या माध्यमातूनसुद्धा महिला या उपक्रमात सहभागी होऊ शकतात. सदर उपक्रमात सहभागी होण्यासाठी 15 नोव्हेंबर 2020 ही शेवटची तारीख असल्याचेही श्री. सोळस्कर यांनी या वेळी सांगितले. प्रारंभी दैनिक "सकाळ'च्या वतीने नगराध्यक्षा माधवी कदम व इतर मान्यवर महिलांचा तुळशीचे रोप, तंत्रस्नेही शिक्षक या पुस्तकाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर यांनी आभार मानले.
मी सहभागी होतेय...
""सकाळ'च्या माध्यमातून महिलांना नेहमीच न्याय आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. महिलांसाठीच्या विविध उपक्रमांमुळे महिला स्वावलंबी होत असून, त्यामुळे समाज समृद्ध बनत चालला आहे. अशाच प्रकारचा "मैत्रीण' हा उपक्रम "सकाळ'ने सुरू केला आहे. या उपक्रमात मी सहभागी होत असून, इतर महिलांनी सुद्धा त्यात सहभागी व्हावे.''
- अंजली देशपांडे
ज्ञानात भर पडणार...
""सकाळ'च्या अनेक उपक्रमांतून सर्वच स्तरांतील महिला एकत्र आल्या. या महिलांनी एकत्र येत स्वत:च्या विकासाला चालना दिली आहे. "सकाळ'ने असाच नावीन्यपूर्ण उपक्रम "मैत्रीण' या नावाने आणला आहे. दररोज या उपक्रमातून महिलांना विविध विषयांची माहिती मिळणार आहे. या माहितीमुळे महिलांच्या ज्ञानात भर पडणार असल्याने मी त्यात सहभागी होणार आहे. सदर उपक्रमात ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने सहभागी होता येणार आहे.''
- रेणू येळगावकर
मैत्रीण उपक्रमात सहभागी व्हा
""दररोज "सकाळ'च्या माध्यमातून जगदुनियेत सुरू असणाऱ्या घडामोडी आणि उपक्रमांची माहिती आम्हाला मिळत असते. "सकाळ'ने महिलांना केंद्रबिंदू ठेवत मैत्रीण हा उपक्रम सुरू केला आहे. यातून दररोज नवनवीन ज्ञानपूर्ण माहिती देण्यात येत आहे. या उपक्रमात मी स्वत: सहभागी झाले असून, त्यात इतर महिलांनीसुद्धा सहभागी व्हावे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या महिलांना मोठ्या प्रमाणात बक्षिसे सुद्धा देण्यात येणार आहेत.''
- स्वाती ओक
संपादन : सिद्धार्थ लाटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.