Venna Lake Sakal
सातारा

महाबळेश्‍वर : पर्यटकांसाठी वेण्णालेकवर नौकाविहार खुला

महाबळेश्वर पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला.

महाबळेश्‍वर (सातारा) - महाबळेश्वर (Mahabaleshwar) पर्यटनस्थळाचे (Tourism) मुख्य आकर्षण असलेला वेण्णालेक (Vennlake) नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. आज सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नौकाविहार सुरू करण्यात आला.

राज्य शासनाने कोरोनाच्या संसर्गाचे वाढते प्रमाण, तसेच ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेऊन कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात कडक निर्बंध लागू केले गेले. प्रामुख्याने पर्यटनस्थळे बंद करण्याबाबतही निर्णय घेतल्याने महाबळेश्‍वर पर्यटनस्थळावरील सर्वच प्रेक्षणीय स्थळेदेखील बंद करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत येथील वेण्णालेक, ऑर्थरसीट, पाचगणी येथील टेबल लँड वगळता इतर सर्व प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांसाठी खुले करण्यात आली.

नुकतीच राज्य शासनाने नवीन नियमावली जाहीर करताना पर्यटनस्थळे सुरू करण्याबाबत आदेश काढल्याने पालिकेच्या वतीने आज वेण्णालेक नौकाविहार पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. सकाळीच प्रशासक तथा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या हस्ते बोटीची पूजा करून सुरुवात करण्यात आली. या वेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाबळेश्वर पर्यटनास आलेल्या पर्यटकांनी वेण्णालेक नौकाविहाराचा आनंद लुटला. वेण्णालेक खुले झाल्याने या परिसरात पुन्हा एकदा पर्यटकांची रेलचेल अनुभवावयास मिळणार असून, छोटे व्यापारी, व्यावसायिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT