Mahadik Group esakal
सातारा

'महाडिक गटाच्या कोणत्याच कार्यकर्त्याचा शब्द पडू देणार नाही'

सकाळ डिजिटल टीम

इस्लामपूर : कृष्णा कारखाना (Krishna Factory), कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट व कृष्णा अभिमत विद्यापीठाच्या (Krishna Abhimat University) माध्यमातून भोसले कुटुंबीयांनी महाडिक गटातील (Mahadik Group) कार्यकर्त्यांना नेहमीच मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे महाडिक गटाचा कृष्णा कारखाना निवडणुकीत (Krishna Factory Election) सहकार पॅनेलला (Co-operation panel) पाठिंबा असल्याची घोषणा युवा नेते राहुल महाडिक व सम्राट महाडिक यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या उपस्थितीत नुकतीच घोषित केली. (Mahadik Group Announced Support To Co-operation Panel At Islampur Satara Political News)

गेल्या काही दिवसांपासून महाडिक गटाचा पाठिंबा कुणाला, याबाबत अनेक वावड्या उठवल्या जात होत्या.

पेठ (ता. वाळवा) येथील नानासाहेब महाडिक इंजिनिअरिंग कॉलेज येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ज्‍येष्ठ नेते सी. बी. पाटील, कृष्णा कारखान्याचे संचालक गिरीश पाटील यांच्यासह वाळवा तालुक्यातील महाडिक गटाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. महाडिक बंधू म्हणाले, " गेल्या काही दिवसांपासून महाडिक गटाचा पाठिंबा कुणाला, याबाबत अनेक वावड्या उठवल्या जात होत्या. त्यामुळे आम्ही महाडिक गटाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा करत मते जाणून घेतली. बहुतांश कार्यकर्त्यांनी डॉ. सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णा कारखान्याचे काम अतिशय व्यवस्थितपणे सुरू असल्याची मते मांडली.

या बरोबरच भोसले कुटुंबिय व (कै.) वनश्री नानासाहेब महाडिक यांच्यात असलेले जिव्हाळ्याचे संबंध लक्षात घेत सहकार पॅनेलला आम्ही महाडिक गटाचा पाठिंबा देत आहोत. महाडिक गटाचा प्रत्‍येक कार्यकर्ता सहकार पॅनेलच्या पाठीशी ठामपणे उभा राहील." डॉ. सुरेश भोसले म्हणाले," आम्हाला वाळवा, कऱ्हाड व कडेगाव तालुक्यांत समन्वय ठेऊन काम करावे लागते. महाडिक गटाच्या कोणत्याच कार्यकर्त्याचा शब्द आम्ही पडू देणार नाही. आमची ताकद महाडिक कुटुंबीयांच्या समर्थनामुळे वाढली आहे.

Mahadik Group Announced Support To Co-operation Panel At Islampur Satara Political News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT