Maharashtra Kesari competition will held in Satara esakal
सातारा

महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यामध्ये होणार

४ ते ९ एप्रिलदरम्यान अजिंक्यपद कुस्ती लढती

सकाळ वृत्तसेवा

सातारा : यावर्षीची ६४ वी वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात होईल. ही स्पर्धा चार ते नऊ एप्रिलदरम्यान होणार आहे. ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी १८ ते २० एप्रिलदरम्यान भोसरी- पिंपरी चिंचवड येथील मारुती सावजी लांगडे कुस्ती हॉलमध्ये होईल.

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक आज (कै.) मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्रात झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी परिषदेचे वरिष्ठ उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते होते. या वेळी उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे, गणेश कोहळे, हनुमंत गावडे, संभाजी वरुटे, दयानंद भक्त, सरचिटणीस प्रा. बाळासाहेब लांडगे, खजिनदार सुरेश पाटील, तांत्रिक सचिव बंकट यादव, विभागीय सचिव सुनील चौधरी, वामनराव गाते, भरत मेकाले, मुरलीधर टेकुलवार, संपत साळुंखे, शिवाजी धुमाळ, सुभाष घासे, सुभाष ढोणे, विनायक गाढवे, ललित लांडगे आदी उपस्थित होते.

या बैठकीत ६४ व्या वरिष्ठ गट गादी व मातीवरील राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताबाची लढत साताऱ्यात घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साताऱ्यातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात चार ते नऊ एप्रिलदरम्यान या स्पर्धा होतील, तसेच ज्युनिअर व सब ज्युनिअर राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी स्पर्धा मारुती सावजी लांडगे कुस्ती हॉल (भोसरी-पिंपरी चिंचवड) येथे ता. १८ ते २० एप्रिलला होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UGC NET Result: UGC NET निकाल कधी लागणार, जाणून घ्या मागील वर्षांचा ट्रेंड काय सांगतो?

Pune News : आयटी पार्कसह उद्योगांच्या समस्या सोडवा; विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांची सूचना

Neeraj Chopra: ऑलिंपिक रौप्य विजेत्या नीरज चोप्राला आता सुवर्णपदकाचा ध्यास; तांत्रिक बाबींमध्ये सुधारणेचा प्रयत्न

Shirur Accident : शिरूरमध्ये दुर्दैवी अपघात; पिकअप टेम्पोची धडक, दुचाकीवरील दोन तरुण ठार

Chandrashekhar Bawankule: शासकीय जमिनींवरील अतिक्रमणास अधिकारी दोषी; महसूलमंत्री बावनकुळे

SCROLL FOR NEXT