Sharad Pawar
Sharad Pawar sakal
सातारा

पैलवानांच्या समस्यांचा फड सोडवा!

संदीप खांडेकर

सातारा : ग्रामीण भागातील पैलवानांत ‘टॅलेंट’ असल्याचा गाजावाजा करायचा आणि त्यांच्या सोयी- सुविधांकडे दुर्लक्ष करायचे, हा प्रकार नवा राहिलेला नाही. तालीम आहे, तेथे मॅट नाही. पैलवान सराव करतोय, त्याला चांगला खुराक नाही. इतकेच काय तर मॅटवरचे प्रशिक्षण द्यायला प्रशिक्षकच नाही. वयोवृद्ध पैलवानांना मानधन आहे, ते वेळेवर द्यायला शासनाला सवड नाही. अशा अनेक समस्यांनी पैलवानांची कोंडी झाली आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यावर त्यांना मर्यादा आली आहे. समस्यांचा फड सोडविण्यासाठी कोण पुढाकार घेईल, याची त्यांना प्रतीक्षा आहे.

खुराकाचा खर्च पेलवेना...

ग्रामीण भागातील पैलवानांना केवळ दुधावरच दिवस ढकलावे लागत आहेत. तूप, बदाम, अक्रोड, अंडी, मटण, थंडाई असा चांगला खुराक त्यांना मिळतोच असे नाही. शहरातील तालमीत कुस्तीचे धडे गिरविणाऱ्या छोट्या पैलवानांना मोठे पैलवान खुराकाची सोय करतात. कौटुंबिक आर्थिक स्थिती भक्कम नसणाऱ्या पैलवानांना कुस्तीची आवड असूनही, खुराकापोटी कुस्तीला रामराम ठोकावा लागत आहे. कुस्ती प्रबोधिनीत पैलवानांना महिन्याकाठी एक हजार रुपये मानधन दिले जाते. या तुटपुंज्या मानधनावर त्यांचे महिन्याचे गणित जमत नाही. एका पैलवानाचा महिन्याचा खर्च पाच ते सात हजार रुपये असल्याचे प्रशिक्षक सांगतात.

नोकरीची शाश्वती कोण देणार?

पैलवानांना करिअर कसे असेल, याची कल्पना नाही. वयाच्या किती वर्षांपर्यंत कुस्ती करायची, याचे मार्गदर्शन करणारे त्यांना कोणी भेटत नाही. त्यातही नोकरी कधी मिळेल, हेही सांगता येत नाही. एखादा कारखाना किंवा कंपनी त्यांना दत्तक घेण्यास तयार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक पैलवान नोकरीसाठी पुणे जिल्ह्यात कुस्तीसाठी वळले आहेत. जत्रा- यात्रांतल्या मैदानात मिळणाऱ्या मानधनावर पैलवानकी टिकू शकत नाही. त्यातही वयोगटनिहाय कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे धोरणच अस्तित्वात नाही.

मानधनासाठी प्रतीक्षा

महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेल्या पैलवानांना महिन्याकाठी मानधन दिले जाते. ते वेळेवर मिळत नसल्याचा अनुभव पैलवानांना आहे. महाराष्ट्रात केवळ दोनच हिंद केसरी पैलवान हयात आहेत. हिंद केसरी पैलवानांना महिन्याकाठी किमान २५ हजार रुपये मानधन द्यावे, अशी मागणी आहे. त्याची दखल कोणी घेतलेली नाही. पैलवानांच्या मानधनासाठी हयात असणाऱ्या पैलवानांसह त्यांच्या कुटुंबीयांना जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे हेलपाटे मारावे लागतात.

१४, १७, १९ वयोगटातील उत्कृष्ट पैलवानांना एकत्रित करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षकाकडून मॅटवरील कुस्तीचे धडे द्यावेत. त्यांच्या खुराकाची व्यवस्था करावी. प्रत्येक तालुक्यात एक केंद्र स्थापन करून प्रशिक्षणाची सोय करावी. तरच ऑलिंपिक पदक मिळवणे सोपे होईल. अन्यथा पैलवानांच्या कामगिरीचा आलेख कळणार नाही.

- अमृत भोसले (उपमहाराष्ट्र केसरी)

पैलवानाला घडविण्यासाठी दुपारी १२ ते ४ या वेळेत त्यांची शाळा भरवावी. आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्तीत काय चालले आहे, याचा आढावा घ्यावा. पैलवान चमकल्यावर त्याच्याकडे पाहण्यापेक्षा तो चमकावा, यासाठी त्याला आवश्यक बाबींची पूर्तता करावी. दत्तक आखाड्यात व कुस्ती प्रबोधिनीत पैलवानांना दिल्या जाणाऱ्या मानधनाचा शासनाने फेरविचार करावा.

- राम सारंग (राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT