सातारा

ये हुई ना बात...सातारा जिल्ह्याच्या बारावीच्या निकालात सहा टक्यांनी वाढ

सिद्धार्थ लाटकर

सातारा : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या इयत्ता बारावीचा निकाल आज (गुरुवार) दुपारी एक वाजता जाहीर झाला. पालक आणि विद्यार्थी यांनी इंटरनेटच्या माध्यमातून निकाल पाहिला. काेल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा निकाल ९२.१८ टक्के इतका लागला आहे. गतवर्षी पेक्षा यंदाच्या निकालात सहा टक्के वाढ झाली आहे.  

सातारा जिल्ह्यात 37 हजार 144 विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षा दिली. त्यापैकी 34 हजार 238 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये उच्च श्रेणीत 2786, प्रथम श्रेणीतून 12 हजार 380, द्वितीय श्रेणीतून 17 हजार 963 तसेच 1109 पास झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील 17 हजार 775 मुले (88.47 टक्के), 16 हजार 463 मुली (96.55) उत्तीर्ण झाले आहेत.  

बारावी परीक्षेत मुलीच भारी ; कोल्हापूर विभागाचा निकाल 92.42 टक्के

सातारा जिल्ह्यातील शाखानिहाय निकालात विज्ञान शाखा ९८.६१ टक्के , कला शाखा ८०.१८ टक्के, वाणिज्य शाखा ९५.६९ टक्के,  व्यवसाय अभ्यासक्रम ९०.७० टक्के असा लागला आहे. याबराेबरच   
रिपीटर विद्यार्थी एकूण निकाल ३१.६८ टक्के निकाल लागला आहे. यामध्ये विज्ञान शाखा ६३.७१ टक्के, कला शाखा १७.७० टक्के, वाणिज्य शाखा  २८.७७ टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम २४.३७ टक्के निकाल लागला आहे.

सातारा जिल्ह्याचा गतवर्षी 86.23 टक्के इतका निकाल लागला हाेता. यंदा 92.18 टक्के निकाल लागला आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजेश क्षीरसागर यांनी दिली. पालक आणि विद्यार्थी बहुतांश ठिकाणच्या सायबर कॅफेवर निकाल पाहताना दिसत हाेते. मुलांचे निकाल पाहिल्यानंतर अनेकजण सातारी कंदी पेढ्यांच्या दुकानाकडे धाव घेत हाेते. 

दरम्यान कोल्हापूर विभागातील सातारा, सांगली, काेल्हापूर या तीन जिल्ह्यात परीक्षा काळात गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या चाळीस विद्यार्थ्यांवर त्या त्या विषयाची कारवाई झाली आहे. एका विद्यार्थ्याला चौकशीत दोषी आढळल्याने पुढे पाच वर्षे त्याच्यावर परीक्षेसाठी बंदी घातली आहे.ज्या विद्यार्थ्यांना पुनर्मुल्यांकनासाठी फोटो कॉपी हवी आहे, त्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. त्याचे शुल्कही ऑनलाईन भरावे, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुरेश आवारी यांनी केले आहे. 

राज्यात बारावीचा निकाल ९०.६६ टक्के लागला

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष काेराेनाबाधित, साताऱ्यातील कामकाज दाेन दिवस बंद
.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT