Balasaheb Patil Sakal
सातारा

यशवंतरावांच्या विचारावर राज्याची वाटचाल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला.

हेमंत पवार

महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला.

कऱ्हाड - महाराष्ट्राला (Maharashtra) दिशा देण्याचे काम जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्र पुरोगामी विचाराने त्यांनी पुढे नेला. सहकारी साखऱ कारखानदारी उभी करुन सामान्य शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती केली. त्यांच्या विचाराने आज महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन सहकारमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी केले.

जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कऱ्हाड (जि.सातारा) येथील प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस्थळी मंत्री पाटील, खासदार श्रीनिवास पाटील आदिंनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते. दरम्यान मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधुन आलेल्या यशवंत ज्योतीचे स्वागत मंत्री पाटील, खासदार पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

राज्य लेखा समितीचे अध्यक्ष शहाजीराव क्षीरसागर, सातारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग पाटील, पालिकेतील विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, डॉ.अशोकराव गुजर, ॲड.मानसिंगराव पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, राजेंद्र माने, दिलीप चव्हाण, रेश्मा कोरे, मुकुंदराव कुलकर्णी, प्रा. एस. ए. डांगे, प्रा.रामभाऊ कणसे, ए. एन्. मुल्ला, प्रकाश पवार व अबुबकर सुतार, ल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक आदि उपस्थित होते.

मंत्री पाटील म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी खूप त्याग केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर समाजकरणामध्ये काम करताना महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. राज्याची निर्मिती झाल्यानंतर हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराने पुढे गेला पाहिजे, याला आधुनिकतेची कास असली पाहिजे असे धोरण त्यांनी राबवले. राज्यात पिकणाऱ्या मालावर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे यासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिले. त्यांच्या विचाराने महाराष्ट्र राज्याची वाटचाल सुरू आहे. सर्वसामान्य जनतेला आपलंसं वाटणाऱ्या नेतृत्वाची आज जयंती, त्यानिमित्त जनतेच्यावतीने त्यांना विनम्र अभिवादन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT