सातारा

कोयनानगरच्या पर्यटन वाढीसाठी व्यावसायिकांना एमटीडीसीची लवकरच खास सवलत

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागाने सातारा जिल्ह्यातील पर्यटकांचे आवडते डेस्टीनेशन असणारे कोयनानगर येथील निवासस्थान सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. ही निवासस्थाने भाडेपट्ट्यावर चालविण्यास न देता महामंडळाने ती स्वतःच चालविण्याचा निर्णय घेतला असून, दहा डिसेंबरपासून ती सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. 

महामंडळाच्या येथे असणाऱ्या निवासस्थानी 22 रूम रेस्टॉरंट, बागबगीचा आहे. हे निवासस्थान कोयना धरणाच्या वरच्या बाजूला असल्याने धरणाचे अतिशय नयनरम्य व विलोभनीय दृष्य या ठिकाणाहून पाहायला मिळते. महामंडळाने येथील निवासस्थान यापूर्वी भाडेपट्ट्यावर चालवायला दिले होते. गत दीड वर्षापासून ते बंद अवस्थेत असल्याने ते मोडकळीस आले होते. शासनाने पर्यटन क्षेत्रावरील बंदी उठवल्याने मोडकळीस आलेल्या या निवासस्थानाची डागडुजी करून याला पुन्हा गतवैभव देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने काम सुरू केले आहे. स्वच्छता हीच सेवा हे ब्रीद नजरेसमोर ठेवून संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असलेले हे निवासस्थान येत्या दहा डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.

#MarathaReservation : नेत्यांनाे! चर्चा पुरे; आता आश्‍वस्त करा

पर्यटकांच्या आयुष्यातील अनमोल क्षण कायमस्वरूपी यादगार बनविण्यासाठी हा परिसर सज्ज झाला आहे. आगामी काळात याठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग, फोटो शूट, कॉर्पोरेट कंपन्यांच्या बैठका वर्कफ्रॉम नेचर करण्यासाठी खास सवलत देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटकांनी निसर्गाचे भान राखून पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी यावे, असे आवाहन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दीपक हरणे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: ... तर महेंद्रसिंग धोनी CSK संघातील जागा अडवतोय! एबी डिव्हिलियर्स म्हणाला, निवड गुणवत्तेच्या आधारावर झाली पाहिजे

इराणच्या पेट्रोलपेक्षा भारतात चहा महाग! एक लीटर पेट्रोल अन् डिझेलचा दर वाचून बसेल धक्का

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास! पण कुठे आणि कसा? परिवहनमंत्र्यांची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषदेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांची बिनविरोध निवड

Nashik IVF Centers : स्त्रीबीज तस्करीचे धागेदोरे नाशिकमध्ये! महापालिकेकडून १२ आयव्हीएफ सेंटर्सची तपासणी पूर्ण

SCROLL FOR NEXT