सातारा

ठरलं तर; पुसेगावात महाविकास आघाडी लढणार ग्रामपंचायतीची निवडणूक

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव (ता. खटाव) ग्रामपंचायत निवडणूक कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्धार केला आहे. त्याबाबतचा निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे. गत पदवीधर निवडणूक एकत्र लढल्यामुळे महाविकास आघाडीला "एकीचे बळ' लक्षात आले आहे. याच पार्श्वभूमीवर ही महाविकास आघाडी झाली असल्याने या ग्रामपंचायत निवडणुकीत निश्‍चित विजय मिळेल, असा विश्वास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी "महाविकास'च्या कार्यकर्त्यांना दिला. 

पुसेगाव येथे महाविकास आघाडी जाहीर करण्यासाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये डॉ. जाधव बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, मोहनराव जाधव, सुनीलशेठ जाधव, विजयराव जाधव, सुरेशशेठ जाधव, योगेश देशमुख, जगन्नाथ जाधव, विलासआप्पा जाधव, शिवाजीराव जाधव, संतोष तारळकर, संदीप जाधव यांच्यासह महाविकासचे कार्यकर्ते उपस्थित होते. डॉ. जाधव म्हणाले, ""फक्त सत्तेसाठी नव्हे तर पुसेगावचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी करण्यात आली आहे. तसेच जागा वाटपासाठी कोणतेही आढेवेढे न घेता तीनही पक्ष एकत्र आल्याने त्यांनी कार्यकर्त्यांचे विशेष अभिनंदन केले.'' 

महाविकास आघाडीत शिवसेनेची फरपट : प्रवीण दरेकर

दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रूपाने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवून गावातील राजकीय समीकरण बदलेलच आणि त्यासोबतच गावात जलक्रांती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे जाळे यांसह नियोजनबद्ध विविध विकासकामे मार्गी लावून सातारा जिल्ह्यासह राज्यात पुसेगाव हे ग्रामविकासाचे आगळेवेगळे मॉडेल म्हणून नावारूपास येईल, असा आशावाद राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री. जाधव यांनी व्यक्त केला.

अहाे, ऐकलत का! स्वस्तात घर खरेदी झाली शक्य

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar NDA Latest Update : बिहारमध्ये निवडणुकीआधीच ‘NDA’त खेला! नितीश कुमारांनी चिराग पासवान यांच्या जागांवर दिले उमेदवार

Mohammad Shami: 'मी जर रणजी खेळू शकतो, तर वनडे का नाही?' ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळल्यानंतर शमीचा थेट प्रश्न

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Maharashtra Politics : विजय वडेट्टीवारांचा आरोप; सत्ताधारी महायुती निवडणुका पुढे ढकलण्याच्या प्रयत्नात; अजित पवारांच्या पक्षाची धर्मनिरपेक्षता खोटी

क्रिकेटला वेस्ट इंडिजची नव्हे, जगाला त्यांची गरज...; गौतम गंभीर स्ट्रेट टू हार्ट, पाहुण्यांच्या ड्रेसिंग रूममधील Video

SCROLL FOR NEXT