सातारा

बहुजनांच्या संस्थांवर टाच आणण्याचा प्रयत्न भाजपने केला : डाॅ. सुरेश जाधव

संजय जगताप

मायणी (जि. सातारा) : पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली असून, वरिष्ठ नेत्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण जीव ओतून कामाला लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमेदवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत आसगावकर निश्‍चित विजय होतील, असा ठाम विश्वास राष्ट्रवादीचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी व्यक्त केला. 

येथील जगन्नाथराव जाधव स्मृति विज्ञान भवनात आयोजित पदवीधर व शिक्षक मतदारांच्या बैठकीमध्ये श्री. गुदगे बोलत होते. यावेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणजितसिंह देशमुख, दादासाहेब काळे, माजी सभापती अशोकराव गोडसे, बाजार समितीचे सभापती शशिकांत देशमुख, संचालक किरण देशमुख, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष विवेक देशमुख, विक्रांत लाड, प्रा. चौगुले, मायणी शिक्षण संस्थेचे संचालक दिगंबर पिटके, प्रशांत सनगर आदी मान्यवर उपस्थित होते. 

मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्थेने दिलेला शब्द प्रमाण मानून काम करतात. शरद पवार यांनी संस्थेला 25 लाख रुपयांची मदत दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ""आधीच्या सरकारने बहुजनांच्या संस्थांवर टाच आणण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित ठेवले. सुशिक्षित तरुण बेरोजगार केले. त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर देऊया.'' 

कोरोनाबाधितांसाठी शिक्षक, पदवीधर निवडणुकीत मतदानाची ठरली वेळ

रणजितसिंह देशमुख, पोपट मिंड यांनीही मनोगत व्यक्त केले. दादासाहेब कचरे यांनी प्रास्ताविक केले. माजी प्राचार्य इब्राहिम तांबोळी यांनी आभार मानले. बैठकीला मायणी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखा शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT