सातारा

"माझा सातारा" पुस्तिकेत सामावला समग्र सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

सिद्धार्थ लाटकर

सातारा : जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या "माझा सातारा" या पुस्तिकेचे प्रकाशन नुकतेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्या प्रसंगी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे आदी उपस्थित होते.

सातारा जिल्हा म्हटले की, निसर्ग सौंदर्याची लयलूट. महाबळेश्वर, पाचगणी येथील विहंगम सह्याद्रीच्या कड्याकपारीतील सौंदर्य, कासचा सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येणारा फुलांचा महोत्सव. साताऱ्यात याबरोबरच शौर्याच्या अनेक पाऊलखुणा, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी रण गाजवलेल्या अनेक घटना आजही या जिल्ह्याच्या हृदयात आहेत. उभ्या महाराष्ट्राच्या अस्मिता असलेल्या अनेक घटनाही याच जिल्ह्यात घडलेल्या आहेत. निसर्ग सौंदर्यासाठी सातारा जिल्हा दक्षिणेचा काश्मीर म्हणून जसा ओळखला जातो, तसेच भारताच्या इतिहासातील वैभवी पान म्हणूनही या जिल्ह्याचे महत्व अपार आहे.

'कोयना जलविद्युत'ला बळकटी शक्‍य; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याने नवीन प्रकल्पाला मिळणार गती!

आजही हा जिल्हा देशातला सैनिकी जिल्हा म्हणून ओळखला जातो. हजारो भूमीपुत्र आजही देशाच्या सुरक्षेसाठी तैनात आहेत. ही आहे या जिल्ह्याची खासियत. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाण्याबरोबर प्रकाशही देत आहे. त्यामुळे ही महाराष्ट्राच्या कपाळावरची ललाट रेषाच असावी जणू, एवढं या कोयना धरणाचे महत्व आहे.

जिल्ह्यातील गरजूंसाठी घरकुल योजना प्रभावीपणे राबविणार : पालकमंत्री पाटील

महाराष्ट्रातील अनेक धरणांचा दिशादर्शक म्हणूनही कोयनेकडे पाहिले जाते. पर्यटन, इतिहास, याबरोबर धार्मिक अधिष्ठान असलेली अनेक ठिकाणं या जिल्ह्यात आहेत. या सर्व श्रीमंतीबरोबर या जिल्ह्याने विकासात्मक कार्यातही राज्याच्याच नव्हे, तर देशाच्या समोर अनेक मैलाचे दगड निर्माण केले आहेत. हे सगळे शाश्वत विकासाचे प्रारुप अनेक जिल्ह्यासाठी दिशादर्शक आहेत. या सर्व गोष्टी पर्यटकांसाठी एकत्र मिळाव्यात म्हणून  माझा सातारा पुस्तिका जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत लॉकडाउनचा कोणताही विचार नाही : शेखर सिंह

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT