Mahabaleshwar Taluka esakal
सातारा

महाबळेश्‍वरात दरडी कोसळून रस्त्यांचं मोठं नुकसान

अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर (सातारा) : दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) महाबळेश्वर तालुक्यातील (Mahabaleshwar Taluka) पश्चिम भागातील विविध रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे, अशा सूचना आमदार मकरंद पाटील (MLA Makarand Patil) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Construction Department) अधिकारी यांना केल्या. महाबळेश्वर तालुक्यात दोन आठवड्यांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. (Major Damage To Roads Due To Heavy Rain At Mahabaleshwar Satara Marathi News)

अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील तापोळा, कोट्रोशी व कुंभरोशी या रस्त्यांवर जागोजागी दरडी कोसळून मोठे नुकसान झाले.

या अतिवृष्टीमुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील तापोळा, कोट्रोशी व कुंभरोशी या रस्त्यांवर जागोजागी दरडी कोसळून मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी रस्ते तुटून ते दरीत कोसळले आहेत. अनेक ठिकाणी डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर दगड माती वाहत आली आणि ती रस्त्यांच्या खाली असलेल्या पाइप मोरीमध्ये अडकली. त्यामुळे डोंगरावरून येणारे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्याने रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी संरक्षक भिंती व रस्त्यांचे भराव वाहून गेले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक कोटीचे नुकसान झाले आहे. रस्त्यांच्या नुकसानीची पाहणी आमदार पाटील यांनी केली.

या वेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीचे सभापती संजय गायकवाड, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता महेश गोंजारी, शाखा अभियंता दिनेश पवार, प्रवीण भिलारे, सुभाष कदम, डॉ. प्रमोद शेलार आदी उपस्थित होते. आठ ते दहा ठिकाणी छोटे- छोटे पूल बांधण्याची सूचना सभापती गायकवाड यांनी केली होती. त्याप्रमाणे छोटे-छोटे पूल बांधण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतला आहे. अशा पुलांचे प्रस्तावही सार्वजनिक बांधकाम खात्याने तयार केले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून या कामाला लागणारी निधी तातडीने सार्वजनिक विभागाकडे वर्ग करण्यासाठी मंत्रालय स्तरावर आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले.

Major Damage To Roads Due To Heavy Rain At Mahabaleshwar Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT