Supriya Sule Sakal
सातारा

Supriya Sule : 'गृहखात्याचा वचक नाही'; साताऱ्यात महिलेला भररस्त्यात मारहाण प्रकरणी सुप्रिया सुळे आक्रमक

आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दत्ता लवांडे

सातारा : साताऱ्यातील माण येथे एका महिलेला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा प्रकार काल घडला होता. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांकडून याप्रकरणी संताप व्यक्त केला जात आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून यासंदर्भातील व्हिडिओ शेअर करत आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

"माण, सातारा येथे महिलेला भररस्त्यात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ माध्यमातून पाहण्यात आला. हा व्हिडिओ अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे. गृहखात्याचा वचक कुठेही दिसून येत नाही. त्यामुळे महिलांवर अत्याचार करणाऱ्या प्रवृत्ती निर्ढावल्या आहेत.

राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी गृहमंत्र्यांनी आपल्या खात्याकडे लक्ष देणे खुप गरजेचे आहे. महिलांना अशाप्रकारे मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे." असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये ?

या व्हिडिओमध्ये एक महिला रस्त्यावर पडलेली असून चार जण तिला लाथाबुक्क्यानी जबर मारहाण करताना दिसत आहेत. तर गावातील चौकामध्ये अनेक लोकं हा प्रकार पाहताना दिसत आहेत. बघणाऱ्यांपैकी एकजणही सोडवण्यासाठी पुढे येत नाही. महिलेकडून घेतलेले पैसे परत मागितल्याने चौघांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Supriya Sule Tweet

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT