Satara Rain  sakal
सातारा

Satara Rain : माणला महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस;जूनमधील स्थिती,पंधरवड्यात ३३२ टक्के पर्जन्यमान

माण तालुक्यावर जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच वरुणराज प्रसन्न झाल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच सरासरी दोनशे मिलिमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

-रूपेश कदम

दहिवडी : माण तालुक्यावर जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच वरुणराज प्रसन्न झाल्याने ओढे, नाले खळाळू लागले आहेत. जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच सरासरी दोनशे मिलिमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त पाऊस माणमध्ये पडला आहे. महाबळेश्वरमध्ये १८६.७ मिलिमीटर पडला आहे. गेल्या कित्येक वर्षात प्रथमच असं घडलं असून, माणमधील पावसाचे प्रमाण हे पहिल्या पंधरवड्यातील सामान्य पावसाच्या ३३२ टक्के इतके आहे.

माण तालुका मागील काही महिन्यांपासून दुष्काळाशी झुंज देत आहे. ऐन उन्हाळ्यात तर भीषण पाणीटंचाईचा सामना करताना सामान्य ग्रामस्थांसह प्रशासन मेटाकुटीस आले होते. टँकरद्वारे मोठ्या लोकसंख्येला, तसेच जनावरांना पाणी पुरवताना अडचणींचा डोंगर उभा राहात होता. सर्व जण वळिवाकडे आस लावून बसले होते; पण एप्रिल व मे महिन्यांत म्हणावा असा वळीव कोसळलाच नाही. त्यामुळे सर्व जण पावसाची चातकासारखी वाट बघत होते.

जून महिन्यात माण तालुक्यात रिमझिम पावसाला सुरुवात होत असते आणि तो सुद्धा पडला तर पडला नाहीतर बहुतांशीवेळा जून पावसाच्या प्रतीक्षेतच जातो. मुसळधार पाऊस अन् तो सुद्धा जून महिन्यात अनेकांनी गेली कित्येक वर्षे पाहिलेला नाही, काहींना तर आठवत सुद्धा नाही. मात्र यंदाचा जून माणसाठी काही वेगळाच आहे. साधारण ५ जूनला पावसाने माण तालुक्यात दमदार आगमन केले. ५ जूनपासून आजपर्यंत अपवाद वगळता दररोज थोडा का होईना पाऊस पडतोय. त्यातही अनेकदा दमदार स्वरूपाचाच पाऊस पडतोय.

सातत्याने पडत असलेल्या या दमदार पावसाने मोकळ्या शेतशिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी साठल्याने ताली फुटल्या आहेत. काही ठिकाणी शेतं वाहून गेली आहेत. ओढ्यानाल्यांना पूर आल्याने सिमेंट बंधारे भरभरून वाहू लागले आहेत, तर पाझर तलावांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तळ गाठलेल्या विहिरी काठोकाठ भरण्याच्या तयारीत आहेत. या पावसाने शेतकऱ्यासह सर्वसामान्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

नऊ दिवस जोरदार पाऊस

माणमध्ये १ जून ते १७ जूनपर्यंत सामान्यपणे ५९.६ मिलिमीटर पाऊस पडतो; पण प्रत्यक्षात यंदा या कालावधीत एकूण १७ दिवसांपैकी सरासरी ९ दिवस पाऊस पडला असून, आजपर्यंत १९५.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्य पावसाच्या ३२७.५% इतका आहे. या उलट महाबळेश्वरमध्ये ५२०.५ मिलिमीटर अपेक्षित असताना फक्त १८६.७ मिलिमीटर पडला असून, टक्केवारी सामान्य पावसाच्या फक्त ३५.९% इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT