सातारा

भाविकांनाे.. काळूबाईला येताय, थांबा! मंदिर राहणार महिनाभर बंद

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीची वार्षित यात्रा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी रद्द करण्यात आली आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला देवीची मुख्य यात्रा आहे. दरम्यान, 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत दर्शनासाठी मंदिरही बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेश व निर्देशांनुसार यात्रेतील धार्मिक विधी, पूजाअर्चा रूढी परंपरेनुसार स्थानिक पातळीवरील देवस्थानचे ट्रस्टी, मंदिर पुजारी व ग्रामस्थ अशा मोजक्‍याच भाविकांनी करण्याच्या सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर- चौगुले यांनी दिल्या आहेत.
 

मांढरदेव येथील काळूबाई ही महाराष्ट्रासह इतर राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. जानेवारी महिन्यात पौष पौर्णिमेला देवीची वार्षिक यात्रा भरते. 27, 28 व 29 जानेवारी रोजी देवीची मुख्य यात्रा आहे. मात्र, महिनाभर देवीचा यात्रोत्सव चालतो. कोरोनामुळे यात्रा, जत्रांसह गर्दी होणारे सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी तो पूर्णपणे थांबलेला नाही. मांढरगडावर यात्रा कालावधीत मोठ्या संख्येने भाविक येणार ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने बैठक घेऊन यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात्रेसंदर्भात घेतलेल्या बैठकीस तहसीलदार रणजित भोसले, पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे- खराडे, गटविकास अधिकारी उदय कुसुरकर, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, देवस्थानचे सचिव रामदास खामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

साताऱ्यातील गोंदवल्यात आज मध्यरात्रीपासून संचारबंदी; जिल्हा प्रशासनाचा महत्वपूर्ण आदेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यातील बहुतांश यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. याच अनुषंगाने मांढरदेव येथील यात्रा रद्द करण्याबाबत पूर्व नियोजन बैठक घेऊन मंदिर पुजारी, स्टॉलधारक व मांढरदेव ग्रामस्थ, देवस्थानचे विश्वस्त यांच्या उपस्थितीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. 13 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा संपूर्ण पौष महिना दर्शनासाठी मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला. दर वर्षी यात्रेसाठी बाहेरगावाहून येणारे व्यावसायिक मांढरदेव गावात येणार नाहीत व मांढरदेवसह परिसरातील यात्रेनिमित्ताने पै- पाहुण्यांना बोलावू नये, याही दृष्टीने दुकानदार व परिसरातील सर्व गावांतील ग्रामस्थांनी व मांढरदेव ग्रामस्थांनी काळजी घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी यांनी केल्या.

रावणाने सीतेचे हरण केले तीच ही सीतागुंफा! नाशिकच्या पंचवटीत त्या खुणा आजही..

पुणे - बंगळूर महामार्गावर बिबट्याचे ठाण; अर्धा तास खाेळंबली वाहतुक

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे राम! जैन मुनी निलेशचंद्र यांच्याकडून कौतुक; उद्धव ठाकरेंवर केली टीका, काय म्हणाले?

Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल स्पर्धेसाठी भारताचे १२५ खेळाडू सज्ज; जाणून घ्या खेळाडूंची यादी अन् Live Streaming Chanel

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रीचं बॉलिवूडमध्ये पदार्पण; 'या' चित्रपटातून करणार नवी इनिंग

Latest Marathi News Live Update : नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन, उद्धव ठाकरे राममंदिराच्या दिशेनं रवाना

FDA Action: तुकाराम मुंढेंची मुंबईत धाड! १० लाखांचे साबण जप्त, अन्न व औषध विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT