Wai-Satara Road Accident Mandhardev Kalubai Darshan esakal
सातारा

मांढरदेव येथून काळूबाईचं दर्शन घेऊन परतताना काळाचा घाला; दुचाकी-ट्रकच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार

वाई-सातारा रस्त्यावर पाचवडजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली.

सकाळ डिजिटल टीम

मांढरदेवला काळूबाईचे दर्शन घेऊन सोमनाथ चव्हाण व रेखा चव्हाण हे दांपत्य दुचाकीवरून (एमएच ५० एच ६३२४) गावी उंब्रजला निघाले होते.

भुईंज : वाई-सातारा रस्त्यावर (Wai-Satara Road) पाचवडजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील पती, पत्नी जागीच ठार झाले. सोमनाथ नानासो चव्हाण (वय ४६, रा. उंब्रज, ता. कऱ्हाड) व रेखा सोमनाथ चव्हाण (वय ४०) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

हे दांपत्य काल (गुरुवार) मांढरदेवहून देवदर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला. याबाबत घटनास्थळ आणि भुईंज पोलिसांनी (Bhuinj Police) दिलेली माहिती अशी, मांढरदेवला काळूबाईचे दर्शन घेऊन सोमनाथ चव्हाण व रेखा चव्हाण हे दांपत्य दुचाकीवरून (एमएच ५० एच ६३२४) गावी उंब्रजला निघाले होते.

काल दुपारी तीनच्या सुमारास पाचवडजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला (एमएच १० सीक्यू ६१२९) त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात हे दांपत्य जागीच ठार झाले. त्यांच्या नातेवाइकांनी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन मृतदेह ओळखल्यानंतर सायंकाळपर्यंत शवविच्छेदनासाठी कार्यवाही सुरू झाली.

दरम्यान, वाई-पाचवड या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुरुस्ती व अतिक्रमणे काढून रुंदावलेला हा रस्ता या अपघातानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अपघाताची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत, तर या तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे हवालदार अप्पासाहेब कोलवडकर करीत आहेत.

मदतकार्यासाठी धावले; पण..

अपघातानंतर मदतीसाठी अनेक लोक घटनास्थळी धावले; पण दांपत्य जागीच ठार झाल्याने काहीच करता आले नाही. या अपघाताचा प्रसंग पाहून पाचवड बाजारपेठेसह परिसर गहिवरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT