Manoj Jarange-Patil esakal
सातारा

Manoj Jarange : 250 किलो फुलांचा 15 फुटी हार अन् 10 जेसीबीतून मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी; कराडात भव्य स्वागत

Manoj Jarange-Patil : जरांगे-पाटील यांच्याकडून महाराष्ट्रात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

हेमंत पवार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरे यांना कुणबी दाखल्यांचे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला आहे.

कऱ्हाड : एक मराठा.. लाख मराठा..., आरक्षण (Maratha Reservation) आमच्या हक्काचे.. नाही कोणाच्या बापाचे, कोण म्हणतो देत नाय.. घेतल्याशिवाय राहत नाय..., मनोज जरांगे तुम आगे बडो.. हम तुम्हारे साथ है..., जय भवानी.. जय शिवराय... या जयघोषात मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांचे मराठा समाजाच्या वतीने २५० किलो फुलांचा १५ फुटी हार घालून जेसीबीव्दारे पुष्पवृष्टी करत कऱ्हाडला (जि. सातारा) जंगी स्वागत करण्यात आले.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयरे यांना कुणबी दाखल्यांचे आरक्षण लागू करावे यासह अन्य मागण्यांसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी महाराष्ट्रात मोठा लढा उभा केला आहे. त्याला मराठा समाजाचाही चांगला पाठिंबा मिळत आहे. जरांगे-पाटील यांच्याकडून महाराष्ट्रात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअंतर्गत आज शनिवारी साताऱ्यात शांतता रॅली होणार आहे. त्यासाठी जरांगे-पाटील कोल्हापूरवरुन कऱ्हाडमार्गे आज साताऱ्याला रवाना होण्यापूर्वी कऱ्हाडच्या पाटण तिकाटणे येथे काहीकाळ थांबले होते. त्यादरम्यान त्यांचे कऱ्हाडमध्ये त्यांच्यावर जेसीबीव्दारे मराठा समाजाच्या वतीने फुलांचा वर्षाव करुन स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर क्रेनच्या सहाय्याने २५० किलोचा १५ फुटी हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागताला उपस्थित राहून साताऱ्याच्या रॅलीस जाण्यासाठी मराठा समाजाचे समन्वयक, तरुण, महिला, तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

यावेळी मनोज जरांगे तुम आगे बडो.. हम तुम्हारे साथ है..., एक मराठा.. लाख मराठा... या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. जरांगे-पाटील यांच्या स्वागतानंतर त्यांच्यासोबत मराठा समाजाचे आबालवृध्द साताऱ्याला रवाना झाले. मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यासाठी कऱ्हाडचे पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकुर, कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, कऱ्हाड तालुका पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT