Balasaheb Thorat  esakal
सातारा

Balasaheb Thorat : महायुतीचे बरेच नेते आमच्या संपर्कात

सध्या महायुतीत बरीच गडबड सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केला.

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - शरद पवार आणि छगन भुजबळ यांची भेट जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी असेल तर आनंदच आहे. जातीजातीत तेढ निर्माण होणे, हे योग्य नाही. मात्र, ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे. सध्या महायुतीत बरीच गडबड सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे विधिमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केला.

ज्येष्ठ नेते विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पुतळा अनावरण आणि कोयना बॅंकेच्या इमारत उद्‌घाटनासाठी आमदार थोरात आज येथे आले होते. त्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर उपस्थित होते. आमदार थोरात म्हणाले, ‘छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट नेमकी कशासाठी घेतली, हे माहिती नाही.

ते जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी भेटले असतील तर आनंदच आहे. जातीजातीत तेढ निर्माण होणे, हे योग्य नाही. मात्र, ते तेवढ्यासाठीच भेटले का? हा प्रश्न आहे. सध्या महायुतीत बरीच गडबड सुरू आहे. त्यामुळे महायुतीचे बरेच नेते आता आमच्या संपर्कात येत आहेत. मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, समाजा-समाजात तेढ निर्माण होवू नये.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT