सातारा

साताऱ्यात मराठा क्रांती मोर्चाची झाली गाेपनीय बैठक; आंदोलनाचा पवित्रा

उमेश बांबरे

सातारा : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती आणल्यामुळे आता शासनाने तातडीने अध्यादेश काढावा. यासाठी सर्व आमदार व खासदारांनी सरकारवर दबाव आणावा. अन्यथा, असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशारा सातारा जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आला आहे.
कोयना धरण परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का
 
सातारा जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाची गोपनीय बैठक शनिवारी (ता.12) झाली. या बैठकीत सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर स्थगिती देताना जी कारण दिली. त्यावर चर्चा झाली. न्यायालयीन लढाई हा एकमेव मार्ग आता मराठा समाजासमोर असल्याने या मार्गाने लढाई लढण्यासाठी अभ्यासाअंती उतरण्याबाबत मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते, विधिज्ञ, अभ्यासक यांनी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अशी जाहीर भूमिका बैठकीत मांडण्यात आली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाजावर अन्याय होणार आहे. या अन्यायाविरोधात समाजातील तरुण पेटून उठले आहेत. मराठा क्रांती मोर्चालाही निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या जीवावर व मतांवर आजपर्यंत मोठे झालेल्या राज्यातील आमदार, खासदार, मंत्र्यांनी तातडीने राज्य सरकारला अध्यादेश काढण्यासाठी दबाव आणावा. आमदार, खासदार, मंत्र्यांनी सरकारवर दबाव आणला नाही, तर त्यांच्याविरोधात असहकार आंदोलन करावे लागेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला.

सातव्या राणीच्या कथित पुत्राने दाखविले सात तारे; व्यावसायिकाला सव्वा कोटीचा गंडा
 
केंद्रात वेगळे सरकार व राज्यात वेगळे सरकार आहे. भाजपच्या आमदार व खासदारांनी केंद्रात पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांशी तातडीने चर्चा करावी, तर शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज्यातील सरकारबरोबर अध्यादेशाबाबत तातडीने चर्चा करावी. भाजप व मित्रपक्षांच्या आमदारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणून या प्रक्रियेत तातडीने मराठा समाजाच्या बाजूने भूमिका घेतली गेली पाहिजे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

अजिंक्‍यतारा रस्त्याची दुर्दशा, बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष 
 
मराठा आरक्षणाचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत केंद्र व राज्य सरकारने कोणतीही भरती करू नये. मराठा समाजातील विद्यार्थ्यांवर व युवकांवर अन्याय होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य सरकारने नव्या योजना लागू कराव्यात, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. राज्य पातळीवर मराठा क्रांती मोर्चा जो निर्णय घेईल त्यानुसार पुढची वाटचाल राहील. तोपर्यंत तालुका पातळीवरील मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी आपापल्या भागातील आमदारांशी तातडीने चर्चा करावी. राज्याच्या मराठा क्रांती मोर्चाने कोणत्याही आंदोलनाचा निर्णय घेतला, तर सातारा जिल्हा त्यात पुढे असेल, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT