सातारा

छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटरसाठी मराठा क्रांती मोर्चाचा पुढाकार

किरण बाेळे

फलटण शहर : येथे वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव व ऑक्‍सिजन बेडअभावी होणारे मृत्यू रोखण्यासाठी येथील मराठा क्रांती मोर्चाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज कोविड केअर सेंटर उभारून त्यात सर्वसोयींनीयुक्त आणि ऑक्‍सिजन युनिटसह ताबडतोब 20 व टप्प्याटप्प्याने अजून 20 असे एकूण 40 बेड्‌स उपलब्ध होणार असून, या रुग्णालयात डॉक्‍टरसह इतर सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत.
 
सुरक्षित शारीरिक अंतर राखत झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांनी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येत आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा क्रांती मोर्चा फलटण यांनी पुढे येत सद्यःस्थितीत शहर व तालुक्‍यातील लोकांसाठी "एक हात मदतीचा' याप्रमाणे मोर्चाची बैठक आयोजित करून त्यामध्ये कोविड रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आपण पुढे येऊन प्रशासनाला व आपल्या लोकांना मदत करण्याचा सर्वानुमते ठराव करत सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

शिवविचार खरंच आपण अंमलात आणतो का? : अश्विनी महांगडे 

त्यानंतर हे रुग्णालय कुठे उभ करावयाचे अशी चर्चा झाली असता सद्‌गुरू व महाराजा उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी स्वतः हे रुग्णालय उभे करण्यासाठी आपली शाळा देण्याचे जाहीर केले, तसेच तेथे स्वच्छता, पिण्याचे पाणी व इतर लागणाऱ्या सर्व सुविधा देण्याचे आश्वासन दिले. रुग्णालयात डॉक्‍टर, नर्स व कर्मचारी आम्ही उपलब्ध करून देणार असल्याचे तहसीलदार पाटील यांनी स्पष्ट केले. कोविड रुग्णालयात उपचारासाठी लागणाऱ्या सुविधा व सामग्रींबाबत चर्चा करून संबंधितांना बोलावून सर्वांसमोर हे कोविड रुग्णालय उभारण्याचे काम दिले. या वेळी जमा झालेली आर्थिक मदतही देण्यात आली. सुरुवातीला ऑक्‍सिजनसह तातडीने 20 बेड्‌स उभारले जाणार आहे. हे 20 बेड्‌सचे रुग्णालय उभारल्यानंतर आठ दिवसांत अधिकचे 20 बेड्‌स ऑक्‍सिजनसह उभारण्यात येणार आहेत, असे क्रांती मोर्चाकडून सांगण्यात आले आहे.

महाबळेश्वरातील पथारी व्यावसायिक होऊ लागलेत आत्मनिर्भर; कसे ते वाचा

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: भारताच्या फिरकी जाळ्यात अडकले ऑस्ट्रेलियन्स! चौथा T20I जिंकून टीम इंडियाची मालिकेत आघाडी

Ausa News : अतिवृष्टीत सर्वस्व गमावलेल्या शेतकऱ्यांच्या लेकींचा उद्धव ठाकरे यांच्यासमोर टाहो

Dy Chief Minister Attacked: धक्कादायक! आधी निदर्शने, नंतर उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला, बिहारमध्ये नेमकं काय घडलं?

Solapur Crime : बार्शीत दारु पिण्यास पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात दारुच्या बाटल्या फोडल्या. दोघांविरोधात गुन्हा दाखल!

IND A vs SA A, Test: रिषभ पंतसमोर 'तडगा' स्पर्धक! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पठ्ठ्याचं झुंजार शतक, भारताच्या कसोटी संघासाठी ठोकला दावा

SCROLL FOR NEXT