Maratha Reservation LokSabha Election esakal
सातारा

'लोकसभेसाठी कऱ्हाड तालुक्यातून 500 उमेदवार देणार'; नेत्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाचा निर्णय

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात कऱ्हाड तालुक्यातील मराठा समाजाची मध्यंतरी बैठक झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत गावागावांतून मराठा समाज बांधवांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते.

कऱ्हाड : शासनाने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिले. मात्र, ते न्यायालयात टिकेल की नाही माहिती नाही. त्यातच मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही सगेसोयऱ्यांबाबतचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही, असा आरोप करत तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) कऱ्हाड तालुक्यातून ५०० उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार केला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही धडा शिकविण्याचा निर्धार या वेळी सर्वानुमते करण्यात आला.

गावोगावच्या उमेदवारांनी आतापासूनच अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढून ठेवण्याचेही या वेळी ठरवण्यात आले. लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भात कऱ्हाड तालुक्यातील मराठा समाजाची मध्यंतरी बैठक झाली होती. या बैठकीत ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला (c) आरक्षण देण्याचा ठोस निर्णय न घेता स्वतंत्रपणे १० टक्के आरक्षण देत मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसण्याचा आरोप करण्यात आला.

त्याचबरोबर सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याचे आश्वासन देऊनही ते पाळण्यात न आल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षांना धडा शिकविण्याचा निर्णयाबाबत चर्चा करण्यात आली होती. त्याच कालावधीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत गावागावांतून मराठा समाज बांधवांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले होते.

मराठा व कुणबी हे एकच आहेत आणि त्यानंतरही मराठा समाज बांधवांचा हक्क डावलत सत्ताधारी व विरोधी राजकीय पक्षांनी एक प्रकारे अन्यायच केला आहे, अशी भावना सर्वसामान्य मराठा समाज बांधवांमध्ये निर्माण झाली असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले.

बैठकीत प्रत्येक गावातून कोण- कोण मराठा समाज बांधव निवडणूक लढवणार याबाबत चर्चा झाली. जे मराठा बांधव निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, त्यांच्याशी चर्चा सुद्धा करण्यात आली. गावोगावच्या उमेदवारांनी आतापासूनच अर्ज दाखल करण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढून ठेवण्याचेही यावेळी ठरवण्यात आले.

लोकवर्गणीतून भरणार अनामत रक्कम

मराठा समन्वयकांनी आपापल्या गावातील इच्छुक मराठा बांधवांशी चर्चा करून उमेदवारांची नावे अंतिम करावी. त्याचबरोबर निवडणूक लढविण्यासाठी लागणाऱ्या अनामत रक्कमेचा प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांची अनामत रक्कम भरण्याची परिस्‍थिती नाही, त्यांच्यासाठी गावागावांतून लोकवर्गणी गोळा करण्याचेही या वेळी ठरवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT