Market Committees
Market Committees sakal
सातारा

Satara : बाजार समित्यांची डिसेंबरमध्ये रणधुमाळी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, वडूज, कोरेगाव, पाटण, कुडाळ (जावळी), लोणंद (खंडाळा) या बाजार समित्यांच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होणार आहेत. त्यासाठी मतदार यादीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली असून या यादीवर २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती दाखल करण्याची मुदत आहे. सात डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर अकरा दिवसांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे. या सर्व ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गटाची सत्ता असून सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात राहावी, यासाठी आमदार लक्ष घालणार आहेत.

जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीची तयारी सध्या सुरू आहे. बहुतांशी बाजार समित्यांवर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या गटाची सत्ता आहे. यावेळेस बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशीच लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा नुकताच दौरा झाला. त्यांनी भाजप जिल्ह्यातील सर्व निवडणुका चिन्हावर लढेल, असे सांगितले आहे.

सध्या जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार, दोन खासदार असून मुख्यमंत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यांची भाजपला साथ मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात बाजार समितीत परिवर्तन घडवत भाजपची सत्ता आणण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे प्रयत्न करणार, हे निश्चित आहे. त्यांना भाजपच्या आमदार-खासदारांकडून साथ मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक गटाच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीत यावेळी भाजप व राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी राष्ट्रवादी व भाजपची युतीही होण्याची शक्यता आहे. पण, राष्ट्रवादीला शिवसेना ठाकरे गट तसेच काँग्रेसची साथ मिळाल्यास महाविकास आघाडीचा प्रयोग बाजार समित्‍यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून केला जाऊ शकतो.

अंतिम मतदार यादी सात डिसेंबरला

सध्या सातारा, कऱ्हाड, फलटण, वाई, वडूज, कोरेगाव, पाटण, कुडाळ (जावळी), लोणंद (खंडाळा) या बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम सुरू आहे. १४ नोव्हेंबरला कच्ची मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर हरकती, आक्षेप घेण्यासाठी २३ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. त्यानंतर या हरकती, आक्षेपांवर निर्णय देण्यासाठी दोन डिसेंबरपर्यंत मुदत आहे. सात डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर अकरा दिवसांनी प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. त्यामुळे डिसेंबरमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार, हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT