crime latest marathi news sakal
सातारा

विवाहितेच्‍या खूनप्रकरणी चौघांवर गुन्‍हा; उपचारादरम्‍यान झाला होता मृत्‍यू

- प्रवीण जाधव

सातारा : गंभीर स्‍वरूपाची मारहाण केल्‍याने विवाहितेचा मृत्‍यू झाल्‍याच्‍या फिर्यादीनुसार काल रात्री सातारा शहर पोलिस ठाण्‍यात खेड येथील गोवर्धनगर येथील चौघांवर खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याची फिर्याद अतुल दत्तात्रय धुमाळ (रा. पुणे) यांनी नोंदवली.(crime latest marathi news satara)

खेड येथील गोवर्धननगरमध्‍ये सुजाता शंकर भोळे (वय २४) या राहण्‍यास होत्या. २०१८ मध्‍ये त्‍यांचा विवाह झाला होता. मुलगी झाल्‍याच्‍या कारणावरून त्‍यांचा शंकर भोळे व इतरांनी छळ चालू केला. लॅब सुरू करण्‍यासाठी, तसेच इतर कारणासाठी माहेरहून ५ लाख आणावेत, यासाठी नंतर त्‍यांनी सुजाता यांना मारहाण करणे सुरू केले. ता. २० रोजी सकाळी शंकर भोळे यांनी सुजाता यांना उपचारासाठी जिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केल्‍याचे अतुल धुमाळ यांना फोनद्वारे सांगितले. यानंतर ते साताऱ्याकडे येण्‍यास निघाले. याचदरम्‍यान उपचारादरम्‍यान सुजाता यांचा मृत्‍यू झाला.

या वेळी त्‍यांच्‍या शरीरावर मारहाणीच्‍या खुणा होत्‍या. यानंतर सुजाता यांचे शवविच्‍छेदन पुणे येथे करण्‍यात आले. मारहाणीमुळेच सुजाता यांचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप करत याबाबतची फिर्याद अतुल धुमाळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली. यानुसार शंकर काळूराम भोळे, लीलाबाई काळूराम भोळे, राजेंद्र काळुराम भोळे, स्‍वाती राजेंद्र भोळे (सर्व रा. खेड) यांच्‍यावर खुनाचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

आजचे राशिभविष्य - 17 मे 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 मे 2026

New Marathi Books Review : वाचनीय आणि संग्रहणीय! अध्यात्मापासून ते पर्यटनाच्या अनुभूतीपर्यंत, नव्या पुस्तकांची रंजक सफर

साप्ताहिक राशिभविष्य : (१७ मे २०२६ ते २३ मे २०२६)

SCROLL FOR NEXT