सातारा

म्हसवड पालिकेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव दाखल

सलाउद्दीन चाेपदार

म्हसवड (जि. सातारा) : पालिकेच्या उपाध्यक्षा स्नेहल युवराज सूर्यवंशी यांनी बैठकीत ठरल्याप्रमाणे एक वर्षाची मुदत संपूनही पदाचा राजीनामा दिला नाही. या उलट विरोधकांना हाताशी धरून सलग चार वर्षे उपाध्यक्षपदाचा लाभ घेतल्यामुळे पालिकेतील सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे पालिकेतील गटप्रमुख धनाजी माने यांनी सत्ताधारी गटातील सात नगरसेवकांसह विरोधी गटातीलही सात अशा एकूण 14 नगरसेवकांच्या स्वाक्षरीने सूर्यवंशी यांच्यावर अविश्वास ठराव पालिका सभेत मांडण्याचा लेखी अर्ज नगराध्यक्ष भगतसिंग विरकर यांच्याकडे नुकताच दिला.
 
पालिकेत एकूण सदस्य संख्या 19 आहे. यामध्ये दोन्ही गटांतील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश आहे. सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे 11 व विरोधी गटातील कॉंग्रेस पक्षाचे सात असे सभागृहात संख्या बलाबल आहे. स्नेहल सूर्यवंशी या सत्ताधारी परिवर्तन पॅनेलमधून पालिकेच्या उपाध्यक्ष पदावर गेली चार वर्षे असून, त्यांना या पदावर नियुक्त करताना सत्ताधारी गटातील इतर नगरसेवकांना प्रत्येकी एक वर्षाची संधी देण्याचे निवडणुकीनंतरच्या बैठकीत ठरले होते; परंतु त्यांच्या एक वर्षाच्या कालखंडाची मुदत संपूनही त्यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा न दिल्यामुळे सूर्यवंशी यांच्यावर सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी विरोधी गटातील नगरसेवकांच्या मदतीने अविश्वास ठराव आणण्यासाठी प्रयत्न केले व यशही मिळविले.

त्यानुसार सत्ताधारी परिवर्तन पॅनेलचे गटप्रमुख धनाजी रामचंद्र माने यांच्यासह सविता अनिल माने, कलावती सुरेश पुकळे, सविता राहुल म्हेत्रे, गणेश शशिकांत रसाळ, दीपक ब्रह्मदेव बनगर, हिंदमालादेवी विजयसिंह राजेमाने या सात नगरसेवकांसह विरोधी गटातील डॉ. वसंत सावळा मासाळ, शोभा जगन्नाथ लोखंडे, शालुबाई दशरथ कोळेकर, मनीषा रवींद्र विरकर, रणजित दगडू येवगे, अकिल शमशुद्दीन काझी, तेजस्वी संजय सोनवणे या सात नगरसेवकांच्या अविश्वास ठराव अर्जावर स्वाक्षऱ्या आहेत. हा अर्ज नगराध्यक्ष भगतसिंह विरकर यांना धनाजी माने यांनी आज देऊन पालिकेच्या सभेत अविश्‍वास ठराव मांडण्याची मागणी श्री. विरकर यांच्याकडे केली.

कोपर्डे हवेलीत राष्ट्रवादी काठावर पास; अवघ्या एक मताने हुकली कॉंग्रेसची संधी

तत्पूर्वी धनाजी माने पत्रकार परिषदेत म्हणाले, ""जनतेने पालिकेची सत्ता परिवर्तन पॅनेलच्या हाती दिली. त्या वेळी सत्ताधारी गटाकडून उपनगराध्यक्षपदासाठी दर वर्षी एकाला संधी देण्याचे सर्वानुमते ठरले होते. मात्र, एक वर्ष पूर्ण झाल्यावर सत्ताधारी गटाने सूर्यवंशी यांना उपाध्यक्ष पदाचा राजीनामा मागितल्यावर त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला.''

Gram Panchayat Results : सातारा जिल्ह्यातील या उमेदवारांचं चिठ्ठीव्दारे उघडलं नशीब; जनतेनं दिला समान कौल

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : अपक्षांचा खेळ उधळणार? कागल निवडणुकीत मतांसाठी गट-तटांची धडपड आणि राजकीय रणनीतीने तापला माहोल

Latest Marathi News Live Update : नवले पूल अपघातानंतर वाहतूक विभागाचा मोठा निर्णय

Video: भिंत पाडण्यासाठी आमदार स्वतः चढले जेसीबीवर; दिलीप लांडेंचा व्हिडीओ व्हायरल

Kalamnuri Nagar Parishad Election : मतांसाठी आता लक्ष जातीवर; उमेदवारांकडून अखेरचे डावपेच, प्रचारासाठी तीनच दिवस

Honour Killing : प्रेयसीनं घरी बोलावलं अन् तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराचे हात-पाय बांधून गोळ्या झाडून केली निर्दयीपणे हत्या

SCROLL FOR NEXT