crime news of satara 
सातारा

Breaking News : अपहरण प्रकरणी सेनेच्या नेत्यावर गुन्हा दाखल

सिद्धार्थ लाटकर /सलाउद्दीन चाेपदार

सातारा/ म्हसवड (जि. सातारा) : सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे माण तालुक्यात वातावरण खुपच तापू लागले असुन बँकेच्या ठरावानंतर डॉ. नानासाहेब शिंदे यांच्या अपहरणाचा तपास करत असतानाच पोलिसांसमोर आणखी दोघांच्या अपहरणाची घटना उघडकीस आली आहे. 

पानवन (ता. माण) येथील दोघांच्या अपहरणप्रकरणी शिवसेनेचे शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा म्हसवड पोलिसांनी रविवारी रात्री उशीरा गन्हा नोंद केला आहे. हा अपहरणाचा प्रकार कशासाठी करण्यात आला याचा तपास पोलिस करत आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पानवण (ता. माण) येथील धनाजी आबाजी शिंदे व त्यांचे मित्र छुब चव्हाण यांना गुरुवार (ता.२५) पासून रविवार (ता. २८) पर्यंत शेखर भगवान गोरे, राजेंद्र उर्फ राजू ब्रम्हदेव जाधव, संग्राम अनिल शेटे, दत्ता घाडगे, राहुल अर्जुन गोरे वीरकुमार पोपटलाल गांधी व गाडीवरील चालक हरिदास गायकवाड यांनी (एमएच ११ - ७०५७) मधून जबरदस्तीने बसवून माण तालुक्यातीलच कुळकजाई येथील फार्म हाऊस तसेच ठाणे येथील लॉजवर थांबवून ठेवले होते.

याबाबत धनाजी आबाजी शिंदे यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेखर गोरे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास म्हसवड ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT