Vijay Khilare sakal
सातारा

Ramadan Eid : हिंदू युवक तेवीस वर्षांपासून करतोय रमजान उपवास

मसूर येथील हिंदू धर्मीय विजय युवराज खिलारे हे २३ वर्षांपासून रमजान उपवास करत आहेत. विजय हे जातीय सलोख्याचे उदाहरण ठरले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मसूर येथील हिंदू धर्मीय विजय युवराज खिलारे हे २३ वर्षांपासून रमजान उपवास करत आहेत. विजय हे जातीय सलोख्याचे उदाहरण ठरले आहेत.

मसूर - येथील हिंदू धर्मीय विजय युवराज खिलारे हे २३ वर्षांपासून रमजान उपवास करत आहेत. विजय हे जातीय सलोख्याचे उदाहरण ठरले आहेत. गेल्या २३ वर्षांपासून रमजान महिन्यात २६ व २७ वा हे मोठे उपवास करत आहेत, जो मुस्लिम समुदाय पाळतो. हिंदू धर्माचे असूनही, हे कुटुंब हिंदू धर्मात ज्याप्रमाणे नवरात्री, गणेश चतुर्थी, दिवाळी आणि होळी साजरे करतात, त्याच प्रकारे रमजान महिन्यावर विश्वास ठेवतात आणि साजरा करतात.

येथे काल शाही युथ फाउंडेशन, चाँदतारा यंग ग्रुप कडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम समाजाचा रमजान महिना सुरू आहे. त्यानिमित्त सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या इफ्तार पार्टीला सातारा जिल्हा बँकेचे संचालक लहुराज जाधव, सुदाम दीक्षित, संजय शिरतोडे, कादर पिरजादे, रमेश जाधव, सुनील जगदाळे, संग्राम जगदाळे, संभाजी जगदाळे यांनी उपस्थित राहून मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या. रमजानच्या रोजाची सांगता इफ्तारने होते.

सूर्योदयापूर्वी तांबडं फाटण्यापूर्वीपासून तर सूर्यास्तानंतरची लालसर कांती फिटेपर्यंत दिवसभर रोजा ठेऊन सूर्यास्तानंतर थोडंसं काही खाऊन पाणी प्याले जाते आणि त्यानंतर खाण्यापिण्यास परवानगी असते, या सोपस्काराला ‘इफ्तार’ म्हणतात. एक रोजा आणि हा इफ्तार गरिबांना मदत करण्याची प्रेरणा देतो, असे कादर पिरजादे यांनी सांगितले. या इफ्तार पार्टीसाठी युन्नुस मुल्ला, शकील मिस्त्री, मुस्ताक मुल्ला, मोहसीन मुल्ला, मुक्तार मुल्ला, सलमान पटेल, साहिल मुल्ला, वजीर शेख, सोहेल मुल्ला, सईद बागवान, साजिद मिस्त्री, वाहिद मुल्ला, तौफिक शेख, अरबाज शेख, सोहेल पिरजादे व मसूरमधील सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT