masur railway station flyover lights off again cause accident Sakal
सातारा

Satara News : मसूरच्या रेल्वे उड्डाणपुलावरील विजेचे दिवे पुन्हा बंद; अपघात होण्याची शक्यता; प्रवाशांमध्ये संताप

उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला आहे किंवा नाही हेही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे कधी वाहनधारक उड्डाणपुलाखालून, तर कधी उड्डाणपुलावरून ये- जा करताना दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मसूर : मल्हारपेठ पंढरपूर मार्गावर मागील काही दिवसांपासून वेगवेगळ्या घटनांनी चर्चेत असलेल्या व समस्येच्या विळख्यात अडकलेल्या मसूर रेल्वे उड्डाणपुलावरील लाइट आठ ते दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे उड्डाणपुलावर लाइट नसल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असून, येथे मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मसूर रेल्वे गेटवर करोडो रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलावर सुमारे २५ ते ३० फूट उंचीच्या कमानी बसविण्यात आल्या असून, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांना तिरंगासदृश एलईडी लाइट बसविण्यात आल्या होत्या.

त्यामुळे रात्रीच्या वेळी ते एक विहंगम असे दृश्य दिसत होते. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून या उड्डाणपुलावरील सर्वच लाइट बंद असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. उड्डाणपुलावर रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य पसरत असून, एखादी वाटमारीची घटनाही घडण्याची शक्यता आहे.

उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला आहे किंवा नाही हेही वाहनधारकांच्या लक्षात येत नाही त्यामुळे कधी वाहनधारक उड्डाणपुलाखालून, तर कधी उड्डाणपुलावरून ये- जा करताना दिसत आहेत. उड्डाणपुलावरील सर्वच लाइट बंद असल्यामुळे वाहनधारकांची मोठी कोंडी होत आहे.

पूल चालू आहे किंवा नाही हेही लक्षात येत नाही, त्यामुळे अचानक कुठून जायचे असा गंभीर प्रश्न वाहनधारकांसमोर निर्माण होत आहे. पुलावरील लाइट बंद असल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. उड्डाण पुलावरील लाइट तातडीने सुरू कराव्यात, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.

एलईडी लाइट अद्याप गायबच....

पुलावरील एलईडी लाइटचे उद्‍घाटन करण्यापूर्वी दीड महिना अगोदर मसूरच्या रेल्वे गेटवरील उड्डाण पुलावरील कमानीच्या सुमारे दहा लाख रुपयाच्या एलईडी लाईट चोरीला गेले होते. लाखो रुपयांच्या एलईडी लाइट्स चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

मात्र, ही घटना स्थानिकांनी उद्‍घाटन करण्यापूर्वी एक महिन्यापूर्वी घडल्याचे बोलले जात होते. मात्र, तेरी भी चूप, मेरी भी चूप या उक्तीप्रमाणे या घटनेची पोलिसात तक्रार दाखल केली गेली नव्हती. याचे गौडबंगाल काय? का कुंपणानेच शेत खाल्ले, अशी उलटसुलट चर्चा सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT