सातारा

पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; दाेन युवक ठार, दोघे गंभीर जखमी

पुरुषाेत्तम डेरे

कवठे (जि. सातारा) : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सुरुर (ता. वाई) येथे पुणे सातारा लेनवरील उड्डाणपूलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास चार चाकीने पाठीमागून मालट्रकला धडक दिली. या भीषण अपघातात दोन युवक  ठार झाले आहेत तसेच दोघे गंभीर जखमी झालेत. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, सुरुर हद्दीतील महामार्गावरील उड्डाणपूलावर गुरुवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पुणे सातारा लेनवर ट्रक (एमएच 12 पी क्यू 6846) चा उजव्या बाजूचा पुढील टायर फुटलेने मालट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूस उभा होता. या उभ्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या चार चाकी वाहनाने (एमएच 04 जी डी 1205) जोरादार धडक दिली. या अपघातात चार चाकीचा चूराच झाला. 

या वाहनातील अजय राजेंद्र सुतार (चालक, वय 26) आणि केदार दत्तात्रय वेल्लाळ (वय 25) हे दोघे युवक जाग्यावरच ठार झाले. हे दाेन्ही युवक मसूर (ता. कराड) येथे वास्तव्यास असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. तसेच वाहनातील सुजित रामचंद्र आवटे (वय 42) आणि अशोक कांबळे (वय 35) दोघेही राहणार कराड हे गंभीर जखमी झाले आहेत. 

या अपघाताची माहिती मिळताच जोशी विहीर महामार्ग पोलिस केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक एस. के. पोवार व त्यांचे कर्मचारी तसेच भुईंज पोलिस केंद्राचे कर्मचारी घटनास्थळी गेले. या अपघातामुळे महामार्गावरुन साताराच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली हाेती. दरम्यान पोलिसांनी गंभीर जखमींना सातारा येथील खासगी रुग्णालयात पाठविले. दरम्यान ठार झालेल्या युवकांना कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले.

माझ्या तर बुद्धीच्या बाहेर आहे, त्यांनाच विचारा; उदयनराजेंचा टाेला

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : शिवम दुबेच्या दोन चेंडूंनी सामना फिरवला, प्रिंस यादवने पदार्पणाचा सामना गाजवला; आयर्लंडला स्वस्तात रोखले

ओमराजे आता गद्दारीचा शिक्का कसा पुसणार? धाराशीवच्या सभेत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, काय म्हणाले?

ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video

Akkalkot FoodSafety: अक्कलकोटमध्ये गुटखा, अन्नभेसळ, अशुद्ध पाणी व निकृष्ट दूधविक्रीवर धडक कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

Paithan Irrigation Project: ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेतील रखडलेले पूल; रस्ते खोदकामामुळे शेतकरी व वाहनधारकांचे हाल

SCROLL FOR NEXT