flemingo esakal
सातारा

Good News : मायणी पक्षी संवर्धन झाले राजपत्रित; महाराष्ट्र शासनाची अधिसूचना जारी

मायणी, येरळवाडी व कानकात्रे तलावात देशी-विदेशी पक्षी हजेरी लावतात.

अंकुश चव्हाण

कलेढोण (सातारा) : जिल्हातील वन विभागाच्या राखीव वनांमध्ये समाविष्ट असलेल्या मायणी (Mayani Lake), येरळवाडी व कानकात्रे आणि परिसराचे उक्त क्षेत्र हे महाराष्ट्र शासन राजपत्रात मायणी पक्षी संवर्धन राखीव या नावाने नुकतेच अधिसूचित करण्यात आले. त्यामुळे मायणी, येरळवाडी व कानकात्रेतील परिस्थिती, प्राणीजातीय, प्राणी, पक्षी व वनस्पतींचे व त्यांच्या अधिवासाचे संरक्षण होणार असल्याने पक्षी, पर्यावरण प्रेमींचा आनंद द्विगुणित झाला आहे. (Mayani Lake Area In Satara District Awarded Conservation Reserve Status)

मायणी, येरळवाडी व कानकात्रे तलावात देशी- विदेशी पक्षी हजेरी लावतात. त्यात लेसर फ्लेमिंगो, ब्लॅक टेल्ड गॉडविट, जकाना, ओपन बिल्स स्टॉर्क आदींचा समावेश असतो. यामध्ये येथील भौगोलिक परिस्थितीत आढळणारे किटक, प्राणी, वनस्पतींचा समावेश आहे. त्याचे संरक्षण होण्यासाठी मायणी, कानकात्रे व येरळवाडीतील ग्रामस्थांशी कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेट व विभागीय वनाधिकारी सागर गवते, तत्कालीन उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी मायणीत प्राथमिक चर्चा केली.

त्यानंतर वन विभागाने मायणी पक्षी समूह पक्षी संवर्धनाचा प्रस्ताव शासन पाठविला होता. त्यानंतर त्यास शासनाने तत्त्वत: मान्यता दिली. मात्र, नुकतेच राज्य शासनाने केंद्रीय अधिनियमांन्वये तयार केलेले राजपत्र प्रकाशनात मायणी संवर्धन राखीवची अधिसूचना काढली. त्यात मायणीतील 218.24 हेक्‍टर, कानकात्रेतील 14.94 हेक्‍टर, येरळवाडी तलाव अंतर्गत येरळवाडी, अंबवडे, बनपुरी, नढवळमधील 633.57 हेक्‍टर असे एकूण 866.75 क्षेत्र हे राखीव करण्यात आल्याने येथील वनसंपदा, पक्षी अधिवासास आता संरक्षण मिळणार आहे.

'सकाळ'चेही योगदान

मायणी, कानकात्रे व येरळवाडीतील अधिवास पक्षी नोंदी, निरिक्षणे "सकाळ'ने सुरुवातीपासून नोंदवली आहेत. दुष्काळी भागातील पक्षी संवर्धनासाठी शासन दरबारी सादर केलेल्या प्रस्तावात "सकाळ'मधील कात्रणांची मदत झाल्याने ही अधिसूचना निघण्यास "सकाळ'चे योगदान मोलाचे ठरले आहे.

मायणी आश्रयस्थानाला शासनाकडून आजअखेर न मिळालेला वैधानिक दर्जा मिळाला. भविष्यकाळात व्यवस्थान समितीच्या मदतीने पाणपक्षी संवर्धन व पर्यटनासाठी वाव आणि संधी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात शाश्‍वत विकासास चालना मिळणार आहे.

-सुनील भोईटे, मानद वन्यजीव रक्षक

Mayani Lake Area In Satara District Awarded Conservation Reserve Status

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : कॉंग्रेस नेते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT