सातारा

पुन्हा गुदगे- येळगावकर गटांतच रंगणार मायणीच्या निवडणुकीचा रणसंग्राम

संजय जगताप

मायणी (जि. सातारा)  : ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मायणी गटातील 15 गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, नेते व कार्यकर्ते कमालीचे सक्रिय झाल्याचे दृष्टीस येत आहे. गुदगे- येळगावकर गटातच लढत होणार आहे. 

मायणी गटातील चितळी, कलेढोण, पाचवड, विखळे, गुंडेवाडी, धोंडेवाडी, ढोकळवाडी, हिवरवाडी, कान्हरवाडी, मुळीकवाडी, गारळेवाडी, कानकात्रे, अनफळे, तरसवाडी आणि गारुडी या 15 गावांतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांचे समर्थक, प्रमुख कार्यकर्त्यांनी पूर्वाश्रमीच्या कॉंग्रेसचा हात पुन्हा हातात घेतला आहे. त्यामुळे अपवाद वगळता गोरे समर्थक नावालाही राहिले नाहीत. त्यामुळे गावागावांतील लढत ही पारंपरिक विरोधक असलेल्या जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांच्याच गटात होणार आहे, तर नुकतेच शिवबंधन तोडून कॉंग्रेसमध्ये गेलेले रणजितसिंह देशमुख काही गावांत तिसरे पॅनेल उभे करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यासाठी नेते व स्थानिक कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. ग्रामपंचायतींची संख्या जास्त असल्याने प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्ते व लोकांशी संपर्क साधणे जिकिरीचे होत आहे. अर्थात "रात्र थोडी आणि सोंगे फार' या म्हणीचा प्रत्यय नेत्यांना येऊ लागला आहे.

Video : ग्रामपंचायत निवडणुक लढविणार आहात! सरपंच पेरे पाटलांचा संदेश वाचा 

जिल्हा परिषद सदस्य गुदगे सातत्याने मायणी गटासह तालुक्‍यातील विविध गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. गटातील प्रत्येक गावात काहीना काही विकासकाम उभे केले आहे. त्याचा उपयोग मतदान वाढीसाठी निश्‍चित होणार आहे. दुसऱ्या बाजूला माजी आमदार डॉ. येळगावकर गेली दहा वर्षे सत्तेपासून दूर आहेत. भाजपने संघटनात्मक पातळीवरही येळगावकर यांना काही दिलेले नाही. परिणामी त्यांचे समर्थक कार्यकर्ते कमालीचे नाराज आहेत. त्यामुळे मायणी गटावरील त्यांची राजकीय पकड पूर्वीपेक्षा अधिक ढिली झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी जोर- बैठका काढण्यास सुरुवात केली आहे. 

नेत्यांकडून गाववार बैठकांचा सपाटा 

सध्या सर्व नेत्यांनी गाववार बैठका घेण्याचा सपाटा लावला असून, त्यामध्ये कार्यकर्ते एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. इच्छुकांची यादी तयार करून उमेदवारी अर्जासाठी आवश्‍यक त्या कागदपत्रांची जुळणी करण्याचे आदेशही प्रमुख कार्यकर्त्यांना देण्यात येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ सुरू असून, गावोगावचे राजकीय वातावरण उत्तरोत्तर तापू लागले आहे.

'गाव करील ते राव काय करील', म्हण सार्थ ठरविण्याची हीच ती वेळ : उदयनराजे

Edited By : Siddharth Latkar
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, त्याची चुकीची प्रतिमा तयार केली; ममता कुलकर्णींच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

Woman Doctor Case: आम्हाला गोवण्याचे विरोधकांचे षडयंत्र: दिलीपसिंह भोसले; सुषमा अंधारे, आगवणेंच्या मागे कोणीतरी मास्टरमाइंड

Yashani Nagarajan: माध्यमिक शिक्षण विभागाच्या सखोल चौकशीसाठी समिती: कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन; चुकीचे काम करणाऱ्यांची गय नाही

Woman Doctor Case: 'गोपाल बदनेचा मोबाईल पोलिसांकडे'; फलटण डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी संशयितांना आज न्यायालयात हजर करणार

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना आचारसंहितेपूर्वी दोन हप्ते? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची १५ नोव्हेंबरपूर्वी आचारसंहिता लागण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT