सातारा

..अखेर सातारच्या नगराध्यक्षांनी 'नगरविकास'कडे मागितले मार्गदर्शन!

Balkrishna Madhale

सातारा : पालिकेची सर्वसाधारण सभा लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून झाली नाही. शासनाच्या निर्देशानुसार व्हीसीवर स्थायी सभा घेण्याचा प्रयोग केला होता. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे तो यशस्वी होवू शकला नाही, त्यामुळे पालिकेची सर्वसाधारण सभा ही प्रत्यक्ष उपस्थितीत सोशल डिस्टन्स ठेवून घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी नगरविकास विभागाकडे पत्राव्दारे नगराध्यक्षा माधवी कदम यांनी केली.

नगराध्यक्षा कदम यांनी नगरविकास विभागाचे सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की नगरविकास विभागाच्या संदर्भ पत्रानुसार कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सामाजिक अंतर व अनुषंगाने मार्गदर्शन सूचनेप्रमाणे स्थानिक स्वराज संस्थांनी सभा, बैठका पुढील आदेश येईपर्यंत व्हीसीवरच घेण्यात याव्यात, असे आदेशीत केले आहे. सातारा नगरपालिकेची स्थायी समितीची सभा ता. 13 व 14 ऑगस्ट रोजी व्हीसीद्वारे घेण्यात आली होती. मात्र, नेटवर्क कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय आल्याने ता. 13 रोजी सभा तहकूब करून ता. 14 रोजी घेण्यात आली. त्या सभेत खूप व्यत्यय येत होता. 

स्थायी समितीच्या सदस्यांची संख्या दहा असताना व्हीसीवर खूप व्यत्यय येत होता. पालिकेचे नगरसेवक 44 आहेत. त्यामुळे सभा पार पाडताना खूप अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पालिकेने छत्रपती शाहू कला मंदिर येथे सोशल डिस्टनन्स पाळून प्रत्यक्ष उपस्थितीत ता. 10 जुलै रोजी घेण्याचे नियोजन केले होते. मात्र, शासन आदेशानुसार ती स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर सभा घेण्यात आली नाही. तरी ही सभा व्हीसीऐवजी प्रत्यक्ष उपस्थितीत सोशल डिस्टनन्स पाळून घेण्याबाबत मार्गदर्शन मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, याबाबत संबंधित प्रशासन कोणती भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT