Meals and breakfasts of patients have been stopped since four months in Dhebewadi Rural Hospital 
सातारा

चार महिन्यांपासून रुग्णांचा जेवण-नाश्ता बंद

ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; रुग्णांसह नातेवाईकांत नाराजी, सेवा पूर्ववत करण्याची माग

सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी - येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूती, शस्त्रक्रिया तसेच इतर आजारांवर उपचारासाठी दाखल रुग्णांना शासनाच्या धोरणानुसार पुरवण्यात येणारे दोन वेळचे जेवण, नाश्ता-चहा सुमारे चार महिन्यांपासून बंद आहे. अवघ्या ६५ रुपयांत हे सर्व पुरवणे शक्य नसल्याने ही सेवा थांबविल्याचे सांगण्यात येते. डोंगर, दुर्गम भागातून रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना गैरसोयीशी सामना करावा लागत आहे. ही सेवा तातडीने पूर्ववत सुरळीत करण्याची मागणी होत आहे.

१६ वर्षांपूर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद करून ग्रामीण रुग्णालय सुरू झाले. अनेक दिवस ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ अशीच काहीशी या रुग्णालयाची अवस्था होती. सुरुवातीला अनेक वर्षे प्राथमिक शाळेच्या पत्र्याच्या शेडवजा खोल्यांत रुग्णालयाचे कामकाज सुरू होते. त्यानंतर नव्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले. अनेक वर्षे रखडलेले इमारतीचे बांधकाम २०१५ मध्ये पूर्ण झाल्यानंतर तेथे रुग्णालयाचे स्थलांतर झाले असले तरी समस्यांनी त्याची पाठ सोडलेली नाही.

रुग्णालयात सध्या सुसज्ज अद्ययावत ऑपरेशन थिएटर, लॅब,एक्स-रे तसेच अन्य विभाग कार्यरत असून दुर्गम, दऱ्या-खोऱ्यांतून रुग्ण उपचारासाठी येतात. अशा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच अन्य उपचारासाठी ॲडमिट रुग्णांना शासन धोरणानुसार दोन वेळचे जेवण, नाश्ता-चहा पुरविण्यात येतो. येथेही अनेक वर्षे ही सेवा सुरू होती. मात्र, चार महिन्यांपासून अचानक ती बंद केली. त्यामुळे रुग्णांसह नातेवाईकांची धावपळ होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही सेवा पुरविणाऱ्या ठेकेदाराने सोयीनुसार त्या-त्या रुग्णालयांच्या परिसरात अशी व्यवस्था उभी केली आहे. मात्र, वाढत्या महागाईत ६५ रुपयांत दोन वेळचे जेवण, चहा, नाष्टा पुरविणे स्थानिक व्यावसायिकांना परवडत नसल्याने त्यांनी चार महिन्यांपासून पुरवठा बंद ठेवला आहे. रुग्णालयाने त्याबाबत वरिष्ठांना पत्राव्दारे कळविल्याचेही समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT