सातारा

नवरा बायकाेच्या भांडणात हवालदाराला खावा लागला मार

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : हुमगाव (ता. जावळी) येथे पती आणि पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार पद्मसेन संभाजीराव घोरपडे (वय 28) यांना महिलेच्या पतीने मारहाण करत जखमी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस मुख्यालय सातारा येथे हुमगाव (ता. जावळी) येथील अश्विनी संतोष पवार हिने पती संतोष पवार हा मारहाण करत आहे. यासंदर्भात मला मदत करावी, असा दूरध्वनीवरून पोलिस मुख्यालयात कॉल केला होता. यावरून सातारा येथील पोलिस मुख्यालयावरून याप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यामध्ये या महिलेच्या तक्राराची खात्री करून पुढील कारवाई करावी, असे आदेश मिळाले.

यानुसार पोलिस हवालदार घोरपडे यांनी हुमगाव येथे जाऊन या घटनेची माहिती घेतली. या वेळी पती- पत्नी भांडण करत होते, ते सोडवण्यासाठी गेले असताना महिलेचा पती संतोष पवार याने घोरपडे यांना मारायला सुरुवात केली व जखमी केले. यावरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित संतोष पवारला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश कदम करत आहेत. 

जावळीची कुपोषणमुक्तीकडे वाटचाल : सतीश बुद्धे

उसाच्या ट्रॉलीला कारच्या धडकेत मेढ्यातील चौघे गंभीर 

कुडाळ (जि. सातारा) : येथील पोलिस दूरक्षेत्रापासून जवळच उभ्या असलेल्या एका उसाच्या ट्रॉलीला पहाटे तीनच्या सुमारास कारने मागून जोरदार धडक दिल्याने मेढा येथील चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सातारा येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले आहे. या अपघातात मेढा येथील भाजीपाला व्यापारी आनंदा ढेबे, त्यांची पत्नी व अन्य दोघे जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 
पोलिसांनी सांगितले, की मेढा येथील भाजीपाला व्यापारी आनंद ढेबे हे भाजीपाला आणण्यासाठी कारमधून पहाटे वाईकडे निघाले होते. दरम्यान, कुडाळ पोलिस दूरक्षेत्रापासून जवळ रस्त्याच्या कडेला उसाने भरलेली ट्रॅक्‍टर ट्रॉली उभी होती. या ट्रॉलीला कारची धडक बसली. धडकेच्या आवाजाने तसेच गाडीतील लोकांच्या किंकाळ्या ऐकून परिसरातील लोक झोपेतून जागे होऊन घटनास्थळी धावले. दूरक्षेत्रातील सहायक पोलिस उपनिरीक्षक वाव्हळ तसेच कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोचून कारमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला.
 
कारमधील अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठवण्यात आले. दरम्यान, ट्रॉलीला रिफ्लेक्‍टर लावले नसल्याने हा अपघात घडला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT