सातारा

सातारा : औषध दुकानदारांसाठी जिल्हाधिका-यांचा महत्वपूर्ण निर्णय

Balkrishna Madhale

सातारा : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिका-यांकडून विशेष काळजी घेतली जात असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विशेष प्रकारच्या उपाय योजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील मेडिकल, औषधांची दुकाने पूर्ण वेळ सुरु करण्याचे आदेश आज शुक्रवारी (ता. २८) दिले आहेत. 

सातारा जिल्ह्यात 1973 च्या कलम 144 मधील तरतूदीनुसार १ ऑगस्टपासून ३१ ऑगस्ट पर्यंत आदेश पारीत करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औषधांची दुकाने पूर्ण वेळ सुरु करण्यास मुभा मिळाली आहे. सदरच्या आदेशास 27 ऑगस्ट पासून परवानगी देण्यात आली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा दिवसेंदिवस आकडा वाढत चालला असून बाधितांचे आकडे रोज नवा उच्चांक गाठत आहेत. चाचण्यांची संख्या वाढवल्याने बाधितांचे प्रमाणही जास्त येऊ लागले आहे. हा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हा तत्काळ निर्णय घेतला आहे.

यापूर्वी जिल्हाधिका-यांनी १५ ऑगस्ट रोजी गर्दी टाळण्यासाठी मिठाईची दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 575 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT