Medicinal plant sakal
सातारा

महिला जोपासताहेत औषधी वनस्पती

शेळकेवाडीतील हिरकणी महिला बचत गटाने पारंपरिकता जपताना साधली आर्थिक उन्नती

दिलीपकुमार चिंचकर

साताऱ्यानजीकच्या शेळकेवाडी येथील हिरकणी महिला गटातील महिलांनी औषधी वनस्पतींची रोपवाटिका उभारली असून, त्यात आता विविध प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती वाढत आहेत. पारंपरिकता जपतानाच त्या आर्थिक उन्नती साधत आहेत.

शेळकेवाडी हे छोटेसे गाव आहे. गावातील बहुतांश लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आहे. बहुतांश महिला या शेतीकामात सहभागी आहेत. सन २००५ पासून राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या माध्यमातून ॲवॉर्ड संस्थेच्या वतीने गावात महिला बचत गटनिर्मिती व संगोपनचे काम सुरू झाले. बचत गटांची निर्मिती करून त्यांना विविध प्रकारची क्षमता बांधणी आणि व्यवसाय निर्मितीचे प्रशिक्षण देऊन महिलांना सक्षम करण्याचे काम प्रभावीपणे केले गेले. ग्रामीण महिला उपजीविका विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी महिला गटातील महिलांना सेंद्रिय शेती पद्धती, आधुनिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, शेतीपूरक व्यवसायनिर्मिती यांची माहिती आणि आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले.

त्यात प्रशिक्षण घेऊन हिरकणी महिला शेतकरी गटाने औषधी वनस्पतींची रोपवाटिका उभारली आहे. गटाच्या अध्यक्षा अश्विनी शेळके तर सचिव म्हणून सपना शेळके असून, गटात १५ सहकारी महिला सहभागी आहेत. हल्ली शेतकऱ्यांचा फळबाग, औषधी वनस्पतींची लागवड करण्याकडे कल वाढला आहे. ही मागणी लक्षात घेऊन गटाच्या माध्यमातून औषधी वनस्पतींची रोपवाटिका तयार करण्याबाबत अॅवॉर्डच्या नीलिमा कदम, किरण कदम, प्रकल्प समन्वयक सुनीता बनसोडे यांनी माहिती दिली. महिला बचत गटाच्या माध्यमातून बचत करत होत्याच. तरीही रोपवाटिकेसाठी संस्थेकडून गटास ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन निधी देण्यात आला. गटातील अश्विनी शेळके आणि अनिता शेळके यांना कलम बांधणी, रोपवाटिकेची निगा व व्यवस्थापन, विक्री व्यवस्था याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

महिला प्लॅस्टिकच्या पिशव्यांत माती भरून बी रुजविण्यासह सर्व कामे करतात. सध्या रक्तचंदन, आवळा, हिरडा, रिटा या औषधी वनस्पतींसोबतच साग, अंजन, बहावा, सीताफळ, शेवगा, कोकम यांचीही रोपवाटिका तयार केली आहे. ही रोपे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केली जातात. रोपे निरोगीच राहावीत, यासाठी पूर्ण काळजी घेतली जात आहे. त्याची परिसरातील शेतकरी, बचत गटातील महिला, ग्रामपंचायती यांना विक्री करण्याचे नियोजन महिलांनी केले असून, या औषधी वनस्पतींना दिवसेंदिवस मागणी वाढत असल्याची माहिती अध्यक्षा अश्विनी शेळके यांनी दिली.

औषधी वनस्पती रोपवाटिका आम्ही प्रथमच केली आहे. तसेच शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणारी आणि शाश्वत उत्पन्न देणारी फळझाडांची रोपेही तयार केली आहेत. यातून आम्हाला बऱ्यापैकी आर्थिक लाभ होईलही. मात्र, त्यापेक्षाही औषधी वनस्पती लागवडीस आमचा हातभार लागणार आहे, याचे मोठे समाधान आहे.

-अश्विनी शेळके, अध्यक्षा, हिरकणी महिला शेतकरी गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT